फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या अत्याधुनिक फीचर्ससह दर्जेदार कार्स लाँच करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे बीएमडब्ल्यू. या कंपनीने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. आता कंपनी भारत मोबिलिटी एक्सपो 2025 मध्ये आपल्या दोन नवीन कार्स सादर करणार आहे. यातील एक कार तर देशात पहिल्यांदाच सादर होणार आहे.
बीएमडब्ल्यू ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांच्या दोन नवीन कार सादर करणार आहे, ज्या X3 आणि Mini Cooper S John Cooper Works Packआहे. दोन्हीही जागतिक स्तरावर अनेक उत्तम फीचर्ससह येतात. या दोन्ही बीएमडब्ल्यू कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
बीएमडब्ल्यूने २०२४ मध्ये BMW X3 च्या नवीन जनरेशनचे अनावरण केले. त्यानंतर या कारच्या डिझाइन, इंटीरियर, फीचर्स, सुरक्षा उपकरणे आणि पॉवरट्रेनमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले. या अपडेटेड कारमध्ये आपल्याला एक नवीन फॅसिया, वेगवेगळे डे-टाइम ड्रायव्हिंग लाइट्स, आकर्षक टेललाइट्स आणि एक स्वीप्ट-अप बेल्टलाइन दिसेल.
Bharat Mobility Expo 2025 मध्ये Vinfast च्या ‘या’ 2 इलेक्ट्रिक एसयूव्ही होणार सादर
नवीन X3 ची केबिन BMW च्या नवीन मॉडेल्ससारखी असणार आहे. यात ड्युअल-स्क्रीन सेटअप, टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग आणि सेंटर कन्सोल असेल. त्यात काचेपासून बनवलेला आयड्राइव्ह कंट्रोलर देखील असेल.
नवीन X3 मध्ये पेट्रोल, डिझेल आणि प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन असण्याची अपेक्षा आहे. इंडिया स्पेक मॉडेलमध्ये, ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये दिले जाऊ शकते. त्यात ४८ व्ही माइल्ड हायब्रिड क्षमता देखील असेल. त्याचे इंजिन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले जाऊ शकते.
2025 च्या ऑटो एक्स्पोमध्ये बीएमडब्ल्यू कारसोबतच मिनी कूपर देखील दिसणार आहे. कंपनी इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये त्यांचे नवीन कूपर एस जॉन कूपर वर्क्स (JCW) पॅक प्रदर्शित करेल. त्यात एक स्पोर्टी पॅकेज दिसेल, पण ते मूळ JCW मॉडेलइतके हार्ड-कोर असणार नाही.
Auto Expo 2025 मध्ये Skoda च्या ‘या’ कार्सची दिसणार झलक, लिस्टमध्ये Kodiaq आणि Enyaq चा समावेश
ही कार फक्त ६.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते. तसेच ही कार २४२ किमी प्रतितास या कमाल वेगाने धावू शकते. भारतात मिनी कूपर एस जॉन कूपर वर्क्स पॅकची किंमत ४५ लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे.
१७ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये अधिक बीएमडब्ल्यू कार्स प्रदर्शित केली जातील. नवीन X3 व्यतिरिक्त, ऑटो एक्स्पो 2025 मधील BMW पॅव्हेलियनमध्ये BMW ७ सिरीज, ५ सिरीज आणि X७ तसेच M2, M4 आणि M5 या तीन उच्च-कार्यक्षमता मॉडेल्सचा समावेश असेल.