
फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये नेहमीच नवनवीन कार ऑफर होत असतात. तसेच दिवसाला वाहनांचे लाखो युनिट्स विकले जात असल्याने अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार कार लाँच करत असतात. भारतीय ऑटोमोबाईल बाजारात शनिवारचा दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी टाटा, मारुती, फॉक्सवैगन आणि बीएमडब्ल्यूसह अनेक कंपन्या आपल्या नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
Tata Motors येत्या 15 नोव्हेंबरला हॅरियर आणि सफारीचे नवे व्हेरिएंट बाजारात आणू शकते. त्याचप्रमाणे मारुति ब्रेझाचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील याच दिवशी भारतीय बाजारात सादर केली जाऊ शकते.
भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु
टाटा हॅरियर ही 5-सीटर SUV आहे आणि ज्याला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारचा नवा व्हेरियंट 15 नोव्हेंबरला लाँच होऊ शकतो. नवीन व्हेरिएंटची अपेक्षित किंमत 14 लाख ते 25.25 लाख रुपये दरम्यान असू शकते.
टाटा सफारी 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असून तिलाही ग्लोबल NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. ती 16.3 kmpl मायलेज देण्याचा दावा करते. हॅरियरसोबतच सफारीचेही नवे व्हेरिएंट 15 नोव्हेंबरला लाँच होऊ शकतात. या व्हेरियंटची अंदाजे किंमत 14.66 लाख ते 25.96 लाख रुपये दरम्यान असू शकते.
मारुतीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी ब्रेझा एक आहे. या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन 15 नोव्हेंबरला बाजारात उतरण्याची शक्यता आहे. फेसलिफ्ट ब्रेझाची अंदाजे किंमत सुमारे 8.50 लाख रुपये ठरू शकते.
असं झालं तरी काय की Honda ने 6 वर्षात दुसऱ्यांदा ‘ही’ बाईक केली बंद? जाणून घ्या यामागील कारण
मारुति ग्रँड विटारा आता 3-रो पर्यायासह बाजारात येण्यास तयार आहे. यात 1490 cc क्षमतेचे 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते, ज्यासोबत मॅन्युअल ट्रान्समिशन असेल. या नवीन 3-रो मॉडेलची अंदाजे किंमत 14 लाख रुपये असू शकते.
फोक्सवॅगन टेरॉनही 15 नोव्हेंबरला भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. या SUV मध्ये 1984 cc क्षमतेचे पेट्रोल इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळू शकते. टेरॉनची किंमत अंदाजे 50 लाख रुपये ठेवली जाऊ शकते.