फोटो सौजन्य: Instagram
भारतीय ऑटो बाजारात नेहमीच लक्झरी कार्सची क्रेझ राहिली आहे. त्यातही लक्झरी कार म्हंटल की आपसूकच Mercedes चे नाव पहिले ध्यानात येते. उद्योगपतींपासून ते सेलिब्रेटी मंडळींपर्यंत अनेक जणांच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजची कार हमखास पाहायला मिळते. तसेच, अनेक क्रिकेटर मंडळी सुद्धा मर्सिडीजच्या वेगवेगळ्या कार खरेदी करत असतात.
नुकतेच भारताचा स्टार गोलंदाज Arshdeep Singh ने ब्रँड न्यू लक्झरी कार खरेदी केली आहे. अर्शदीप सिंगने घरी Mercedes-Benz G-class आणली आहे. भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर या कारसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत अर्शदीप आणि त्याचे संपूर्ण कुटुंब या नवीन सदस्याचे त्यांच्या घरात स्वागत करत आहे. अर्शदीपने खरेदी केलेली ही आलिशान कार कोट्यवधी रुपयांची आहे.
असं झालं तरी काय की Honda ने 6 वर्षात दुसऱ्यांदा ‘ही’ बाईक केली बंद? जाणून घ्या यामागील कारण
अर्शदीप सिंगने मर्सिडीज-बेंझ जी-वॅगनची लक्झरी व्हर्जन खरेदी केली. ही मर्सिडीज-बेंझ कार 2925 सीसी किंवा 3982 सीसी इंजिनने चालते. ही लक्झरी कार 325.86 बीएचपी ते 576.63 पीएस पॉवर आणि 850 एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार 5 सीटर एसयूव्ही आहे जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.
मर्सिडीज-बेंझ जी-क्लास 667 लिटर बूट स्पेस देते. ही लक्झरी कार अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसह येते. मर्सिडीजने या कारमध्ये अलॉय व्हील्स वापरले आहेत आणि त्यात मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील आहे. ही मर्सिडीज कार अनेक लक्झरी फीचर्ससह सुसज्ज आहे.
अर्शदीप सिंग क्रिकेटसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. त्याच्या अनेक व्हिडिओंना इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात. अर्शदीपने नुकतेच मर्सिडीजसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. मर्सिडीज-बेन्झ G-क्लासची किंमत 2.55 कोटी ते 4.30 कोटी रुपयांपर्यंत आहे. अर्शदीपने नेमका कोणता मॉडेल खरेदी केला आहे, याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका खेळून अर्शदीप भारतात परतला. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले. ऑस्ट्रेलियावरून परतल्यानंतरच अर्शदीप सिंगने ही लक्झरी कार खरेदी केली आहे.






