Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सला मिळाला विकी कौशलचा पाठिंबा ,बनला कंपनीचा नवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

टाटा मोटर्सला आता बॉलिवूड स्टार विकी कौशलचा पाठिंबा मिळाला आहे. टाटा मोटर्सने विकी कौशलला त्यांच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक कारसाठी नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 21, 2025 | 06:50 PM
टाटा मोटर्सला मिळाला विकी कौशलचा पाठिंबा ,बनला कंपनीचा नवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

टाटा मोटर्सला मिळाला विकी कौशलचा पाठिंबा ,बनला कंपनीचा नवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला आपला नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. याचा अर्थ असा की आता विकी कौशल टाटाच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन विभागाचे प्रतिनिधित्व करेल. विकी कौशल पहिल्यांदाच कार उत्पादक कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. विकी कौशल गेल्या काही काळात त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली आहे. 

विकीचा आपल्या चिकाटी, प्रामाणिकपणा आणि आव्हानात्मक भूमिका घेण्याची तयारी यामुळे प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. त्याचे हे गुण टाटा मोटर्सच्या भविष्यातील गतीला आकार देण्याच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळतात. टाटा मोटर्स ऑटोमोटिव्ह आपल्या डिझाइन, कामगिरी आणि तंत्रज्ञानाच्या सीमा पार करत असताना विकीसोबतची भागीदारी त्यांच्या प्रवासाला एक वेगळा आयाम देते. अगदी सामान्य घरातला एक मुलगा बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक बनतो. हा विकीचा प्रवास टाटा मोटर्सच्या प्रगती आणि नावीन्यपूर्णतेच्या वृत्तीचे प्रतिबिंब आहे. नवनवीन औद्योगिक मानके स्थापित करून टाटा मोटर्स आणि जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचे प्रदर्शन करून विकी जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावत आहेत.

वाहन चालकांनो, कोणता नियम मोडल्यास किती हजारांचा दंड बसतो? जाणून घ्या पूर्ण माहिती

विकी अनेक ब्रँड उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असून या सहयोगाची सुरुवात या आयपीएल हंगामात नवीन टाटा कर्व्‍हच्या जाहिरातीने होईल. ‘टेक द कर्व्‍ह’ असे शीर्षक असलेली ही जाहिरात मोहीम कर्व्‍ह ही फक्त एक कार नाही तर ती धाडस, आत्मविश्वास आणि आपल्या मनाचे ऐकणे या गोष्टींचे प्रतीक असल्याचे सांगते. आयुष्यात येणारे बदल स्वीकारणे महत्त्वाचे असल्याचे सांगते. भविष्याधारित, वैशिष्ट्यपूर्ण मेसेजिंगचे वर्चस्व असलेल्या बाजारपेठेत इतर लोक सरळ जात असताना आपण वेगळे वळण घेणे महत्त्वाचे ठरते.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री विवेक श्रीवत्स म्हणाले, “टाटा मोटर्समध्ये आम्ही सातत्याने उत्कृष्टतेची नवनवीन मानके स्थापित करत आहोत. प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात परिवर्तन घडवताना आम्हाला विकी कौशलचे स्वागत करताना अभिमान वाटतो, त्यांची मूल्ये आमच्याशी सुसंगत आहेत- प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन. विकी आणि टाटा मोटर्स या दोघांनाही भारताचा अत्यंत अभिमान आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी वचनबद्ध आहे. ती भारतीय ग्राहकांसाठी जागतिक दर्जाची वाहने डिझाइन आणि तयार करते. तसेच विकी कौशल जागतिक स्तरावर भारतीय सिनेमा आणि संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतात. आमच्या ब्रँडच्या केंद्रस्थानी असलेली ‘टेक द कर्व्ह’ मोहीम आपला मार्ग निवडणाऱ्या व्यक्तींचा गौरव करते. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना आणि त्याच्या चाहत्यांना आवडेल, अशी खात्री आहे.”

टाटा मोटर्स कुटुंबाचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विकी कौशल म्हणाले, “भारताच्या प्रवासाची व्याख्या नव्याने करणाऱ्या आपल्या ब्रँड टाटा मोटर्ससोबत कारच्या जगात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे. टाटा मोटर्सचा वारसा, नवसंशोधनाप्रति त्यांची वचनबद्धता तसेच परिपूर्णता या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या आहेत. त्यामुळे ही भागीदारी उत्तमच ठरेल. ‘टेक द कर्व्ह’ मोहीम या सहकार्यासाठी परिपूर्ण व्यासपीठ आहे. ती आपल्या मनाचे ऐकून अनवट मार्गांवरून आणखी मजबूत होऊन अडथळे दूर करण्याच्या भावनेला मूर्त रूप देते. मी टाटा मोटर्स कुटुंबासोबत प्रकल्पांमध्ये सहयोग करण्यास आणि आमची कहाणी जगाला सांगण्यास उत्सुक आहे.”

लाँच होताच ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांचे जिंकले मन ! आतापर्यंत मिळाले 50 हजारपेक्षा जास्त बुकींग

Web Title: Vicky kaushal becomes tata motor passenger and electric vehicle brand ambassador chhaava star seen with tata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Electric Vehicles
  • tata motor
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

”लग्नाची एक्सपायरी डेट…”, काजोलचे लग्नाबद्दल मोठं विधान, ट्विंकल म्हणाली, लग्न आहे, वॉशिंग मशीन..’
1

”लग्नाची एक्सपायरी डेट…”, काजोलचे लग्नाबद्दल मोठं विधान, ट्विंकल म्हणाली, लग्न आहे, वॉशिंग मशीन..’

700 वर्षे जुना तो किल्ला जिथे झालं होत कतरिना-विकीच लग्न; राजेशाही काळापासूनची वास्तू आता बनलीये लग्झरी रिसॉर्ट
2

700 वर्षे जुना तो किल्ला जिथे झालं होत कतरिना-विकीच लग्न; राजेशाही काळापासूनची वास्तू आता बनलीये लग्झरी रिसॉर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.