फोटो सौजन्य: iStock
देशात वाहनांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळेच वाहतुकीचे नियम देखील अधिक कडक करण्यात आले आहे. पण असे जरी असेल तरी कित्येक जण रोज वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवताना दिसतात.
खरंतर, देशात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात तसेच जखमी होतात. म्हणूनच, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक पाऊले उचलली जातात. परंतु, तरी देखील काही जण नियम मोडतातच. पण यातही काही जण वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतात. आणि याचे कारण असते फाइनची किंमत. अनेकदा काही लोकं आपल्याला जास्त दंड बसवला म्हणून वाहतूक पोलिसांसोबत भांडत असतात. म्हणूनच आज आपण कोणता नियम मोडल्यास किती दंड बसतो, त्याबद्दल जाणून घेऊया.
सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कार खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री ! EV आणि CNG कार महागणार
दिल्ली वाहतूक पोलिसांच्या मते, जर तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केला जाऊ शकतो.
जर तुम्ही वाहन चालवताना फोन वापरताना आढळलात तर तुम्हाला 5000 रुपये दंड होऊ शकतो.
जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल आणि जर तुमच्याकडे विमा नसेल तर 2000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच, तुम्हाला तीन महिने तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची शिक्षा देखील होऊ शकते. प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नसल्यास १०,००० रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची शिक्षा होऊ शकते. जर तुम्ही पुन्हा इंश्युरन्सशिवाय पकडले गेलात तर मग तुम्हाला 4000 रुपये दंड भरावा लागेल.
सरकार ‘या’ लोकांवर अधिक मेहेरबान, म्हणूनच तर द्यावा लागत नाही Toll Tax?
जर तुम्ही दुचाकीवर ट्रिपल रायडींग चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. त्याच वेळी, जर तुम्ही धोकादायक गाडी चालवताना किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही तर तुम्हाला 10000 रुपये दंड भरावा लागेल.
वाहतूक नियमांनुसार, सिग्नल तोडल्यास 5000 रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास 20000 रुपये दंड भरावा लागेल.
जर एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर लागू असलेल्या शिक्षेमध्ये 25000 रुपयांचा दंड, 3 वर्षांचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि 25 वर्षांचे होईपर्यंत परवाना जारी न करणे यांचा समावेश आहे.