फोटो सौजन्य: Social Media
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत होणारी वाढ आणि इलेक्ट्रिक वाहनांची चांगली रेंज. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आता भारतात उत्तम फीचर्ससह इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहेत. ग्राहक देखील या इलेक्ट्रिक वाहनांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. पर्यावरणपूरक असलेल्या या वाहनांचा वापर वाढत आहे, कारण ते खर्चिक आणि प्रदूषण कमी करणारे आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय होण्याची अपेक्षा आहे.
देशात अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे Ultraviolette. नुकतेच या कंपनीने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर टेसेरॅक्ट लाँच केली आहे. कंपनीने लाँचिंगसोबतच बुकिंग देखील सुरू केले आहे. आता कंपनीने सांगितले की या इलेक्ट्रिक स्कूटरला 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. पहिल्या स्लॉटनंतर अल्ट्राव्हायोलेट अतिरिक्त 30,000 बुकिंगची ऑफर देत आहे. टेसरॅक्टची किंमत 1 लाख 20 हजार रुपयांपासून सुरु होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.
सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कार खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री ! EV आणि CNG कार महागणार
Tesseract ची डिलिव्हरी 2026 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. कंपनीने ही स्कूटर डेझर्ट सँड, सोनिक पिंक आणि स्टील्थ ब्लॅक या 3 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. अल्ट्राव्हायोलेट टेसरॅक्टला 3.5 किलोवॅट तास, 5 किलोवॅट तास आणि 6 किलोवॅट तास असे तीन बॅटरी पर्याय मिळतील. त्याच वेळी, या स्कूटरमध्ये 20.1 बीएचपी पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटर असेल. पूर्ण हेल्मेट ठेवण्यासाठी यात 34 लिटर अंडरसीट स्टोरेज देखील आहे.
अल्ट्राव्हायोलेटने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक फीचर्स दिले गेले आहेत. अॅक्सेसरीजच्या यादीमध्ये पुढील आणि मागील कॅमेरे असलेले ड्युअल रडार समाविष्ट आहेत, जे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ओव्हरटेक अलर्ट आणि टक्कर अलर्ट सक्षम करतात. याव्यतिरिक्त, यात फ्लोटिंग DRLS सह ड्युअल LED-प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि कनेक्टिव्हिटी सूट आणि राइड अॅनालिटिक्ससह मोठा TFT टचस्क्रीन डिस्प्ले आहे.
मार्केट गाजवण्यासाठी लवकरच येणार नवीन Maruti Wagon R, भारतात होणार का लाँच?
यात किलेस अॅक्सेस, पार्क असिस्ट, हिल होल्ड, क्रूझ कंट्रोल, नेव्हिगेशन, म्युजिक कंट्रोल आणि बरेच काही आहे. टेसेरॅक्टमध्ये 14-इंच चाके आहेत. तसेच पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सेटअप आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या स्कूटरमध्ये ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा समावेश आहे.