Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे प्लांटमध्ये नव्या फॉक्सवैगन टायगुनचे उत्पादन सुरू; ‘मेड इन इंडिया’ व्हिजनला बळ

नवा फॉक्सवैगन टायगुन आपल्या पूर्वसुरीने घातलेल्या मजबूत पायावर आधारित असून आकर्षक नव्या डिझाइन एलिमेंट्समुळे दमदार आणि ताजेतवाने लूक देतो. टायगनच्या नव्या आवृत्तीत धारदार डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 07, 2026 | 05:49 PM
पुणे प्लांटमध्ये नव्या फॉक्सवैगन टायगुनचे उत्पादन सुरू; ‘मेड इन इंडिया’ व्हिजनला बळ

पुणे प्लांटमध्ये नव्या फॉक्सवैगन टायगुनचे उत्पादन सुरू; ‘मेड इन इंडिया’ व्हिजनला बळ

Follow Us
Follow Us:

मुंबई : स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने आज (7 एप्रिल 2026) आपल्या अत्याधुनिक पुणे प्लांटमध्ये नव्या फॉक्सवैगन टायगुनचे उत्पादन सुरू झाल्याची घोषणा केली. नवा टायगन “मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड” या ग्रुपच्या व्हिजनला अधिक बळकटी देतो. उच्च लोकलायझेशन, अचूक उत्पादन प्रक्रिया आणि भारतीय ग्राहकांच्या गरजांचा सखोल अभ्यास यांचा संगम या नव्या टायगनमध्ये दिसून येतो.

नवा फॉक्सवैगन टायगुन आपल्या पूर्वसुरीने घातलेल्या मजबूत पायावर आधारित असून आकर्षक नव्या डिझाइन एलिमेंट्समुळे दमदार आणि ताजेतवाने लूक देतो. टायगनच्या नव्या आवृत्तीत धारदार डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स आहेत. भारतीय रस्त्यांच्या विविध परिस्थितींना अनुरूप असा हा वाहन असून, व्हॉल्क्सवॅगनच्या युरोपियन ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, उत्कृष्ट आराम आणि तडजोड न करणारी ५-स्टार सेफ्टी या डीएनएला कायम ठेवतो.

पेट्रोलच्या वाढत्या दरांना पर्याय काय? CNG की हायब्रीड; तुमच्या खिशासाठी कोणती कार ठरेल ‘पैसा वसूल’?

“या घडामोडीवर भाष्य करताना, पियूष अरोरा, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले, “नव्या फॉक्सवैगन टायगुन चे उत्पादन सुरू होणे हे भारतातील आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन व्यवस्थेच्या परिपक्वतेचे प्रतीक आहे. भारतीय उत्पादन केंद्रे जागतिक दर्जाची वाहने उच्च लोकलायझेशनसह तयार करण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे आम्ही भारतातील तसेच निर्यात बाजारातील ग्राहकांच्या मागण्या त्वरित पूर्ण करू शकतो. टायगन हे या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे, जे व्हॉल्क्सवॅगनच्या जागतिक मानकांनुसार इंजिनिअर केले गेले असून भारतात कार्यक्षमतेवर, गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून तयार केले गेले आहे. नव्या टायगनचे उत्पादन सुरू करताना आम्ही भारताला ग्रुपसाठी एक महत्त्वाचे उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून अधिक मजबूत करत आहोत.”

नितीन कोहली, ब्रँड डायरेक्टर, फॉक्सवैगन इंडिया यांनी सांगितले “लॉन्चपासूनच टायगनने आमच्या एसयूव्ही स्ट्रॅटेजीला बळ दिले आहे. भारतीय ग्राहकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देत आमच्या उत्पादन पोर्टफोलिओला मजबूत करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका आहे. नवा टायगन आमच्या मॉडेल लाइन-अपच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनचा केंद्रबिंदू आहे, जो अर्थपूर्ण वाढ घडवून आणेल. चाकण प्लांटमध्ये नव्या टायगनचे उत्पादन सुरू होणे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. प्रीमियम जर्मन इंजिनिअरिंग असलेले उत्पादन भारतीय ग्राहकांना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. आम्हाला खात्री आहे की नवा टायगन आपल्या पूर्वसुरीच्या यशावर आधारित राहून ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावेल.”

२०२१ मध्ये पदार्पण केल्यापासून फॉक्सवैगन टायगुन ने डायनॅमिक परफॉर्मन्स, उत्कृष्ट आराम आणि मजबूत सुरक्षिततेमुळे भारतात तसेच जागतिक बाजारात विश्वासार्ह एसयूव्ही म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत भारतात १,४३,००० हून अधिक युनिट्स तयार झाले असून त्यापैकी सुमारे ३० टक्के निर्यात करण्यात आले आहेत. आता नव्या टायगनचे उत्पादन सुरू झाल्यामुळे व्हॉल्क्सवॅगनच्या एसयूव्ही पोर्टफोलिओला आणखी बळ मिळणार आहे. नवा टायगन डिझाइन, उपयुक्तता, आराम आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम संगम साधून ग्राहकांना ताजेतवाने अनुभव देणार आहे.

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?

Web Title: Volkswagen taigun production begins pune savwipl made in india for india and world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • india
  • Volkswagen

संबंधित बातम्या

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार 10 पेक्षा जास्त नवीन कार! SUV, EV आणि सेडानचा बाजार भरणार!
1

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार 10 पेक्षा जास्त नवीन कार! SUV, EV आणि सेडानचा बाजार भरणार!

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.