Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोक्सवॅगनच्या पार्ट्स पुरवठादाराकडून युरोपमध्ये 3,460 कर्मचाऱ्यांची कपात; 5 साइट्स बंद होणार

फोक्सवॅगनला सुटे भाग पुरवणाऱ्या शेफलर कंपनीने युरोपमध्ये 3,460 कर्मचाऱ्यांची कपात आणि 5 प्रोडक्शन साइट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे? चीनमधील कंपन्यांची स्पर्धा आणि इलेक्ट्रिक वाहनांचे संथ संक्रमण कंपनीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 10, 2026 | 08:33 PM
Schaeffler Announces Major European Job Cuts (फोटो सौजन्य-AI एआय)

Schaeffler Announces Major European Job Cuts (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • शेफलर कंपनी युरोपमध्ये 3,460 कर्मचाऱ्यांची कपात करणार असून 5 प्रोडक्शन साइट्स बंद करणार आहे.
  • एकूण कर्मचाऱ्यांच्या कपातीपैकी जवळपास 75% नोकऱ्या जर्मनीमध्ये कमी केल्या जाणार आहेत.
  • या पुनर्रचनेतून 2030 पासून दरवर्षी 300 दशलक्ष युरोची बचत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

फोक्सवॅगनला सुटे भाग पुरवणारी जर्मनीची कंपनी शेफलर (Schaeffler) आर्थिक अडचणींमुळे मोठा निर्णय घेणार आहे. कंपनी युरोपमधील 3,460 कर्मचाऱ्यांची कपात करणार असून 5 प्रोडक्शन साइट्स बंद करणार आहे. Schaeffler Job Cuts 2026 या निर्णयामागे वाहनांची कमी झालेली मागणी, चीनमधील कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संथ संक्रमण ही कारणे आहेत. हा बदल 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

शेफलरच्या घोषणेनुसार, बंद होणाऱ्या 5 साइट्सपैकी 4 जर्मनीमध्ये, तर 1 बेल्जियममध्ये आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या कपातीपैकी जवळपास 75% कपात जर्मनीत होणार आहे. कंपनी सध्या जगभरात जवळपास 1.09 लाख लोकांना रोजगार देते. जर्मनीतील 31,957 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 9% पदे कमी केली जाणार आहेत. 2024 मधील कपातीसह जर्मनीतील कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 18% ने कमी होईल.

फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV 2027 मध्ये येणार! स्कोडा कायलॅकच्या प्लॅटफॉर्मवर होणार निर्मिती

शेफलर बेअरिंग्ज आणि हायब्रीड-इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनसारखे वाहनांचे सुटे भाग तयार करते. कंपनी जनरल मोटर्स आणि बीएमडब्ल्यूसारख्या वाहन कंपन्यांनाही पुरवठा करते. पेट्रोल-डिझेल वाहनांची मागणी कमी होत असताना इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन अपेक्षित वेगाने वाढलेले नाही. त्यात चीनमधील उत्पादकांकडून कमी किमतीत स्पर्धा मिळत आहे. जर्मनीतील कर्मचाऱ्यांवरील खर्च हा युरोपमधील इतर भागांच्या तुलनेत जवळपास अडीच पट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या कपातीमुळे 2030 पासून दरवर्षी सुमारे 300 दशलक्ष युरोची बचत होण्याची अपेक्षा आहे. पण पुनर्रचनेसाठी कंपनीला एकदाच 480 दशलक्ष युरो खर्च करावे लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मूळ पगारात 10% कपात केली जाणार असून व्यवस्थापनाचे 2 स्तर कमी करण्याचीही योजना आहे. संशोधन आणि विकासावरील खर्चासोबत जास्तीची प्रोडक्शन कॅपसिटी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

Upcoming 7-Seater SUVs India: भारतात येणार 6 नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड SUV! टाटा ते ह्युंदाईपर्यंत कोणकोण आहेत फार्मात

याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीने युरोपमध्ये 4,700 नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली होती. त्यातून 2029 पर्यंत दरवर्षी 290 दशलक्ष युरो वाचवण्याचे उद्दिष्ट होते. आता शेफलर ह्युमनॉइड रोबोट्स आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्यासारख्या नव्या व्यवसायांमध्येही संधी शोधत आहे. त्यामुळे कंपनी वाहन उद्योगावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेफलर कंपनी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे?

    Ans: शेफलर युरोपमध्ये एकूण 3,460 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ही प्रक्रिया 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

  • Que: शेफलर कंपनी किती प्रोडक्शन साइट्स बंद करणार आहे?

    Ans: कंपनी युरोपमधील 5 प्रोडक्शन साइट्स बंद करणार आहे. यापैकी 4 साइट्स जर्मनीमध्ये आणि 1 बेल्जियममध्ये आहे.

  • Que: शेफलर कंपनी कर्मचाऱ्यांची कपात का करत आहे?

    Ans: वाहनांची कमी झालेली मागणी, चीनमधील कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा, इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संथ संक्रमण आणि जर्मनीतील जास्त उत्पादन खर्च ही या निर्णयामागील कारणे आहेत.

Web Title: Schaeffler job cuts 2026 europe 3460 layoffs auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • automobile
  • Volkswagen

संबंधित बातम्या

JSW MG मोटरला या आर्थिक वर्षात 930 कोटींचा तोटा; उत्पन्नात 40% वाढ! काय आहे कारण जाणून घ्या
1

JSW MG मोटरला या आर्थिक वर्षात 930 कोटींचा तोटा; उत्पन्नात 40% वाढ! काय आहे कारण जाणून घ्या

महिंद्राचा ट्रॅक्टर विक्रीवाढीचा अंदाज घटवला! FY27 मध्ये वाढ जवळपास शून्य; मान्सूनचा फटका
2

महिंद्राचा ट्रॅक्टर विक्रीवाढीचा अंदाज घटवला! FY27 मध्ये वाढ जवळपास शून्य; मान्सूनचा फटका

Upcoming 7-Seater SUVs India: भारतात येणार 6 नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड SUV! टाटा ते ह्युंदाईपर्यंत कोणकोण आहेत फार्मात
3

Upcoming 7-Seater SUVs India: भारतात येणार 6 नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड SUV! टाटा ते ह्युंदाईपर्यंत कोणकोण आहेत फार्मात

टाटा पंच CNG AMT ची मायलेज टेस्ट; 1 किलो गॅसमध्ये किती धावली ही SUV? जाणून घ्या
4

टाटा पंच CNG AMT ची मायलेज टेस्ट; 1 किलो गॅसमध्ये किती धावली ही SUV? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.