Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

काही दिवसांपूर्वी Volvo EX30 लाँच झाली होती. आता कंपनीने या कारच्या किमतीची घोषणा केली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 24, 2025 | 03:46 PM
Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री!

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री!

Follow Us
Close
Follow Us:

आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. Volvo कार इंडियाने आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार व्होल्वो ईएक्स30 च्या किंमतीची घोषणा केली आहे. 41 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमतीत ही कार लक्झरी इलेक्ट्रिक कार एक नवा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे 19 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्री-रिजर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना ही कार केवळ 39.99 लाख रुपयांच्या ऑफर किंमतीत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून या कारचे वितरण सुरू होणार असून ही कार पाच आकर्षक रंगांत उपलब्ध राहील.

व्होल्वो ईएक्स30 हे कंपनीचे तिसरे इलेक्ट्रिक वाहन असून ते बंगळुरू येथील होसकोटे कारखान्यात तयार केले गेले आहे. या कारसोबत 11 किलोवॅट वॉल बॉक्स चार्जर स्टँडर्ड दिला जाणार आहे. व्होल्वोचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले की, “भारतीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किंमतीत लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आणताना आम्हाला आनंद होत आहे. आकर्षक डिझाइन, उच्च दर्जाची परफॉर्मन्स आणि शाश्वततेसाठी वचनबद्धता यामुळे ईएक्स30 भारतीय बाजारात नवा ट्रेंड निर्माण करेल.”

Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

या मॉडेलला स्कॅन्डिनेव्हियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. डेनिम, पीईटी बाटल्या, ॲल्युमिनियम आणि पीव्हीसी पाईप्ससारख्या पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करून तयार केलेले आतील भाग त्याला अधिक शाश्वत बनवतात. युरो एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाल्याने त्याची सुरक्षितता अधोरेखित होते. कारमध्ये 5 कॅमेरे, 5 रडार आणि 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्सचा वापर करून प्रगत सेफ्टी सिस्टीम दिली आहे.

सिंगल मोटर एक्सटेंडेड रेंज व्हेरिएंटमध्ये 272 एचपी पॉवर, 343 एनएम टॉर्क आणि 69 किलोवॅट अवर लिथियम-आयन बॅटरी मिळते. ही कार 0-100 किमी/ताशी वेग केवळ 5.3 सेकंदात गाठते आणि याची डब्ल्यूएलटीपी प्रमाणित रेंज 480 किमी आहे. टॉप स्पीड 180 किमी/ताशी तर बॅटरी वॉरंटी 8 वर्षे/1.6 लाख किमी देण्यात आली आहे.

Ola Electric Scooter: फक्त ९ दिवसांची संधी ! ४९,९९९ रुपयांमध्ये ओला स्कूटर आणि बाईक घरी आणा, काय आहे ऑफर?

इंटिरिअरमध्ये 12.3 इंचाचा हाय-रिझोल्यूशन टच डिस्प्ले, गुगल बिल्ट-इन, ॲपल कारप्ले, 5 ॲम्बिएंट लाइटिंग थीम आणि हारमन कार्डन प्रीमियम ऑडिओ सिस्टिम (9 स्पीकर, 1040 वॅट) मिळते. फिक्स्ड पॅनोरामिक सनरूफ, दोन झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर ॲडजस्टेबल सीट्ससह प्रवास अधिक आरामदायी ठरतो.

सेफ्टीच्या दृष्टीने इंटरसेक्शन ऑटोब्रेक, लेन कीपिंग एड, ब्लिस, 360° कॅमेरा, पादचारी ओळखणारे ऑटो ब्रेकिंग यासारखी प्रगत फीचर्स दिली आहेत.

ईएक्स30 सोबत ग्राहकांना 3 वर्षांची वॉरंटी, 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज, 3 वर्षांचा रोडसाइड असिस्टन्स, 5 वर्षांचे डिजिटल कनेक्ट प्लस सब्सक्रिप्शन तसेच वॉल बॉक्स चार्जर दिला जात आहे.

Web Title: Volvo ex30 launched with price of 3999 lakh rupees for limited time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • new car

संबंधित बातम्या

‘या’ नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट, जाणून घ्या किंमत
1

‘या’ नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट, जाणून घ्या किंमत

Yamaha काय ऐकत नाही! एकाच वेळी लाँच केली 4 नवीन वाहने, 2 E Scooters चा समावेश, किंमत…
2

Yamaha काय ऐकत नाही! एकाच वेळी लाँच केली 4 नवीन वाहने, 2 E Scooters चा समावेश, किंमत…

Delhi Blast सोबत कनेक्शन असलेली Hyundai i20 भारतात 17 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्य
3

Delhi Blast सोबत कनेक्शन असलेली Hyundai i20 भारतात 17 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्य

Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेल्या Hyundai i20 च्या मालकाने केल्या ‘या’ चुका, तुम्ही असे काही करू नका!
4

Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेल्या Hyundai i20 च्या मालकाने केल्या ‘या’ चुका, तुम्ही असे काही करू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.