Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ तारखेपासून Volvo च्या Cars महागणार! अचानक का वाढवली किंमत? जाणून घ्या

भारतात आपल्याला अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. Volvo ही त्यातीलच एक आघाडीची कंपनी. नुकतेच कंपनीने त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2026 | 06:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • Volvo Cars च्या किमती वाढणार
  • भारतात Volvo चार प्रमुख मॉडेल्स विकते
  • या सर्व मॉडेल्सची किंमत वाढणार
स्वीडनमधील प्रीमियम कार निर्माता Volvo ने भारतीय बाजारात आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, ही वाढ 1 मे 2026 पासून लागू होणार आहे. सध्या भारतात Volvo चार प्रमुख मॉडेल्स विकते, Volvo EX30, EC40, XC60 आणि XC90. या सर्व गाड्यांच्या किमतीत वाढ होणार असल्याने ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

किती वाढणार आहेत दर?

Volvo India च्या माहितीनुसार, नवीन दर लागू झाल्यानंतर गाड्यांच्या किमतीत कमाल 1 लाख रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. ही वाढ सर्व मॉडेल्ससाठी समान नसून, कारच्या प्रकार आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल. Volvo EX30 ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त कार असून याची एक्स-शोरूम किंमत सध्या सुमारे 41 लाख रुपये पासून सुरू होते. तर Volvo XC90 ही सर्वात महागडी SUV असून याची किंमत जवळपास 97.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. दरवाढीनंतर या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅक्स वाढवून देखील Suzuki च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! ठरली नंबर 1 बाईक

दरवाढीमागील कारणे

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर पुरवठा साखळीत (Supply Chain) येणाऱ्या अडचणी आणि परकीय चलनातील चढ-उतार ही या दरवाढीची प्रमुख कारणे आहेत. विशेषतः Middle East मध्ये सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गाड्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा परिणाम ग्राहकांवर टाकत Volvo ने हा निर्णय घेतला आहे.

400 किमीची रेंज आणि दमदार फीचर्स! Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

इतर कंपन्यांचाही तोच निर्णय

फक्त Volvo नव्हे, तर BMW, Audi आणि Mercedes-Benz सारख्या लक्झरी कार उत्पादक कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढत्या खर्चामुळे संपूर्ण लक्झरी कार सेगमेंटवर याचा परिणाम होताना दिसत आहे.

एकूणच, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे भारतातील लक्झरी कार खरेदी करणे आता अधिक महागडे ठरणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेताना या वाढीचा विचार करणे आवश्यक आहे.

 

Web Title: Volvo india car price increase from 1 may 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Auto
  • automobile

संबंधित बातम्या

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या
1

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या

इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे
2

इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे

Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या
3

Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून
4

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.