Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी?

Electric Car Tips : सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता ग्राहक ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण लोकांच्या मनात ईव्ही संबंधित अनेक प्रश्न आहेत. जसे कारची बॅटरी मध्येच संपली तर?...

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 12:58 PM
EV Battery Turtle Mode

EV Battery Turtle Mode

Follow Us
Follow Us:
  • EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे?
  • बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी?
  • काय आहे हिडन बफर
What Is Turtle Mode in EV : सध्या जगभरात आणि भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत प्रचंड वाढ होत आहे. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. परंतु इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी घेताना लोकांना भीती असते, ती म्हणजे कारची बॅटरी मध्येच संपली तर काय होईल? तुमची गाडीच तिथेच थांबणार की अजून थोडी धावणार? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. याचे उत्तर टर्टल मोड या तंत्रज्ञानात आहे.

हे देखील वाचा : EV Car Features : इलेक्ट्रिक कार चालवताना बॅटरी आपोआप होणार चार्ज? काय आहे ‘हे’ जादुई फिचर?

बॅटरी संपण्यापूर्वी कारकडून इशारा

इलेक्ट्रिक कारची बॅटरी जेव्हा कमी होते त्यावेळी कारचे सॉफ्टवेअर ड्रायव्हरला सतर्क करते. कारमधील स्क्रीनवर लो बॅटरीचा मेसेज येतो किंवा कार बीपचा साऊंड देते. अनेक आधुनिक गाड्या आसपास चार्जिंग स्टेशनचा नकाशाही स्क्रीनवर दाखवतात. याशिवाय कारचे काही फिचर्स बॅटरी कमी होऊ लागल्यावर आपली उर्जा वाचवण्यासाठी काही फिचर्स आपोआप बंद करतात.

काय आहे Turtle Mode ?

अशा वेळी हे टर्टल मोड अत्यंत उपयोगी ठरते. जेव्हा कारची बॅटरी अगदीच कमी झाली असेल तेव्हा कार टर्टल मोडमध्ये प्रवेश करते. या तंत्रज्ञानात स्क्रीनवर तुम्हाला कासवाचे चिन्ह दिसू लागले. ज्याप्रमाणे कासव संथ गतीने चालते, त्याचप्रमाणे तुमच्या कारचा वेग कमी होता. एक्सीलरेशन मर्यादा येतात ज्यामुळे उरलेली बॅटरी वापरुन तुम्ही सुरक्षित ठिकाणी किंवा कार चार्जिंग स्टेशनच्या जवळ पोहचू शकाल.

0% रेंजवरीह धावते ईव्ही?

आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अनेकदा 0% रेंजवरही ईव्ही कार काही किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकतात. ऑटो कंपन्यांनी बॅटरीमध्ये एक हिडन बफर तंत्रज्ञान अॅड केले आहे. या तंत्रज्ञानामुळे तुम्ही कार हवामान, रस्ते, आणि ड्रायव्हिंग स्टाईलनुसार साधारण ८ ते २४ किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकते.

बॅटरी पूर्ण संपल्यावर काय करावे?

आता जर तुम्ही चार्जिंग स्टेशनवर पोहोचण्याआधीच ईव्हीची बॅटरी पूर्णपणे संपली तर कार हळूहळू थांबते. यामुळे कारला साखळीने बांधून नेणे धोकादायक ठरु शकते.  अशी परिस्थितीत इलेक्ट्रिक मोटर खराब होऊ शकते. यामुळे फ्लॅटबेड ट्रक बोलावून कारला उचलून नेणे सुरक्षित ठरेल. यामुळे ईव्ही चालवताना बॅटरी १० टक्क्यांच्या खाली जाण्यापूर्वीच चार्जिंग करणे केव्हाही सुरक्षित ठरेल.

हे देखील वाचा : EV की पेट्रोल कार? ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त? पाहा खर्चाचे संपूर्ण गणित

Web Title: What is ev turtle mode car battery zero percent explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • automobile news
  • Electric Cars
  • Marathi News

संबंधित बातम्या

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
1

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
2

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
3

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
4

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.