फोटो सौजन्य: iStock
लहान मुलं ही देवाघरची फुलं हे आपण नेहमी ऐकत असतो. याचे कारण म्हणजे लहान मुलांमधील साधेभोळेपणा, निरागस असणारे त्यांचे मन आणि लगेच जीव लावणारी वृत्ती. पण याच गोंडस मुलांना जेव्हा आपण आपल्या कारमधून फिरवत असतो तेव्हा काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हल्ली अनेक वेळा आपण पाहतो की लहान मुलं चुकून कारमध्ये लॉक होऊन जातात. अश्यावेळी लहान मुलं तर घाबरून जातातच पण त्यांच्यापेक्षा जास्त भीती त्यांच्या आई वडिलांना वाटते.
लहानशा निष्काळजीपणामुळे तुमच्या मूलाचा इजा देखील होऊ शकतो. अशा काही घटना घडल्या आहेत ज्यात कार लॉक झाल्यामुळे मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की गाडीला लॉक केल्यास मृत्यू कसा होईल?
वास्तविक, जेव्हा चुकून एखादे लहान मूल किंवा इतर कोणी कारमध्ये लॉक होते, तेव्हा काही तासांनंतर कारमध्ये मोकळी हवा राहत नाही. परिणामी गुदमरल्यासारखे होते आणि त्यामुळे जीवही गमवावा लागतो. हे लक्षात घेऊन आज आपण जाणून घेणार आहोत की जर चुकून लहान मूल कारमध्ये लॉक झाले तर त्याला कोणत्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात ज्यामुळे तो स्वतःहून बाहेर पडू शकेल.
जर तुमचे मूल नवीन गोष्टी शिकण्याइतपत मोठे झाले असेल, तर त्यांना गाडीत लॉक झाल्यास आणि एकटे असल्यास काय करावे याबद्दल खालील गोष्टी तुम्ही मूलाला शिकवू शकता.
तुम्ही तुमच्या कारमध्ये हातोडा ठेवत चला. जेणेकरून जर तुमचा मुल कारमध्ये लॉक झाले तर तो त्या हातोड्याच्या साहाय्याने काच फोडून बाहेर पडू शकेल.
मुलांना मोबाईलवरून कॉल करायला शिकवा. या शिकवणीमुळे तुमचं मूल चुकून कारमध्ये लॉक झाले तर कारच्या आतील फोनच्या साहाय्याने तुम्हाला तुम्हाला कॉल करून त्याबद्दल सांगू शकेल. यासोबतच तुम्ही तुमच्या मूलाला त्याचा नंबरही लक्षात ठेवायला हवा.
कारमध्ये नेहमी एक वही आणि पेन ठेवा. मुलाला शिकवा की जर तो कारमध्ये लॉक झाला असेल तर कागदावर मदत असे लिही आणि आरशावर ते लाव. जेणेकरून तेथून जाणाऱ्या लोकांना कळेल की मूल आत आहे आणि त्याला बाहेर पडण्यास मदत होईल.
जर तुम्ही तुमच्या मूलाला कारमध्ये सोडून काही वेळासाठी बाहेर गेलात तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. त्याचवेळी, शक्य असल्यास, मुलांना आपल्या सोबत घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला कार लॉक होण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
जेव्हा तुम्ही मूलाला कारमध्ये सोडता तेव्हा कारची खिडकी थोडी उघडी तर चला, जेणेकरून बाहेरून ताजी हवा कारच्या आत येत राहील. असे केल्याने तुमचं मुल गुदमरणार नाही.
याशिवाय, जर काही कारणास्तव तुम्ही मूलाला कारच्या आत सोडत असाल तर कारचा एसी चालू ठेवा, जेणेकरून कारमध्ये विषारी हवा तयार होणार नाही.