Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत

टोयोटा मोटर्सच्या लक्झरी ऑटो ब्रँड Lexus India ने त्यांची Lexus LX SUV साठी रिकॉल जारी केला आहे. चला जाणून घेऊयात या एसयूव्हीमध्ये कोणता बिघाड झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 07:41 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • लेक्ससच्या एसयूव्हीत झाला बिघाड
  • Lexus LX SUV मध्ये झाला बिघाड
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
जगभरात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि आलिशान कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Lexus. लेक्सस ही Toyoto Motors चे लक्झरी ऑटो ब्रँड आहे. नुकतेच कंपनीने तिच्या दमदार एसयूव्हीसाठी रिकॉल जारी केला आहे.

Lexus India ने आपली लक्झरी एसयूव्ही Lexus LX भारतात रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.80 कोटी रुपये आहे. ट्रान्समिशनमध्ये संभाव्य बिघाड आढळल्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. 6 मार्च 2025 ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान तयार झालेल्या एकूण 117 युनिट्सवर हा रिकॉल लागू होणार आहे. प्रभावित ग्राहकांशी कंपनी थेट संपर्क साधून ही समस्या मोफत दुरुस्त करून देणार आहे.

पगार कितीही कमी असो; फक्त 2000 रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ बाईक, फुल टँकवर धावते 800 किमी

काय आहे नेमकी अडचण?

Lexus LX मध्ये 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे, जे गिअर बदलण्यासाठी लीनियर सोलिनॉइडचा वापर करते. काही विशिष्ट ड्रायव्हिंग परिस्थितीत हा सोलिनॉइड बिघडल्यास सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे ट्रान्समिशन कंट्रोल युनिट आणि इंजिन ECU यांच्यात योग्य माहितीची देवाणघेवाण होत नाही. परिणामी ट्रान्समिशन काही गिअरमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रेव होऊ शकते. वेळेत दुरुस्ती न केल्यास ट्रान्समिशनला नुकसान होण्याची शक्यता आहे. कंपनी ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे विनामूल्य सोडवणार आहे.

संभाव्य धोके कोणते?

ही अडचण कायम राहिल्यास वेगात कार चालवताना इंजिनची पॉवर कमी होऊ शकते. गंभीर परिस्थितीत ट्रान्समिशन हाउसिंगला हानी पोहोचू शकते तसेच ट्रान्समिशन फ्लुइड लीक होण्याचा धोका संभवतो. कंपनीच्या मते कंट्रोल युनिटचे फर्मवेअर अपडेट केल्यास ही समस्या सहज दूर करता येते. हा रिकॉल केवळ भारतापुरता मर्यादित नसून इतर देशांमध्येही याच कारणामुळे Lexus LX मागवण्यात आली आहे. सध्याच्या जनरेशनसाठी हा चौथा रिकॉल असल्याचे सांगितले जाते.

नवीन आणि आकर्षक अवतारात येतेय Maruti Suzuki Brezza, जाणून घ्या इंटिरिअर आणि डिझाइनमधील बदल

भारतामधील Lexus LX 500d व्हेरिएंट

सध्या भारतात Lexus LX 500d हा व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 3.3 लिटर ट्विन-टर्बो V6 डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 304 हॉर्सपावर आणि 700 एनएम टॉर्क निर्माण करते. यासोबत 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. तसेच अ‍ॅडॅप्टिव्ह व्हेरिएबल सस्पेन्शन आणि फोर-व्हील अ‍ॅक्टिव्ह हाइट कंट्रोलसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही एसयूव्ही ऑफ-रोड क्षमता आणि लक्झरी या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट ठरते.

Web Title: Luxury car lexus lx suv recall announced due to problem in transmission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला
1

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक
2

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत
3

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
4

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.