फोटो सौजन्य: @MahindraAus (X.com)
भारतीय मार्केटमध्ये वेवेगळ्या सेगमेंटमधील कार उपलब्ध आहेत. यातही सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. हीच डिमांड लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही लाँच करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होत आहे.
देशात अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी दमदार एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. मात्र, सर्वात जास्त डिमांड ही महिंद्रा कंपनीच्या कार्सना असते. भारतीय मार्केटमध्ये, महिंद्राने एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार ऑफर केल्या आहेत. जर तुम्ही कंपनीच्या बजेट एसयूव्ही महिंद्रा SUV Mahindra XUV 3XO चा बेस व्हेरिएंट MX1 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तेही 2 लाख रुपयांचे डाउनपेमेंट करून तर आज आपण जाणून घेऊयात की दरमहा या एसयूव्हीसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागेल.
महिंद्रा XUV 3XO डिझेलचा बेस व्हेरिएंट म्हणून MX1 देते. या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. जर ही एसयूव्ही राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर RTO ला सुमारे 61 हजार रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 46 हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर महिंद्रा XUV 3XO डिझेल MX1 ची ऑन रोड किंमत सुमारे 9.10 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट MX1 खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर कारला फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 7.10 लाख रुपये फायनान्स करावा लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदरासह 7 वर्षांसाठी 7.10 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 11429 रुपयांचा EMI भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 7.10 लाख रुपयांचे कार लोन 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला दरमहा 11429 रुपये EMI भरावे लागतील. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला महिंद्रा XUV 3XO MX1 साठी व्याज म्हणून सुमारे 2.49 लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 11.60 लाख रुपये होईल.
महिंद्रा XUV 3XO ही सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. कंपनीची ही कार बाजारात थेट Renault Kiger, Maruti Breeza, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue, Nissan Magnite सारख्या एसयूव्हींशी स्पर्धा करते.