फोटो सौजन्य: @Motorcare_ug/X.com
भारतीय बाजारात विविध सेगमेंटच्या कार्सना डिमांड असते. यातही विशेष मागणी एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या बाजारात उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्हीला देखील चांगली मागणी मिळत आहे.
भारतात अनेक उत्तम एसयूव्ही पाहायला मिळतील. भारतीय ऑटो बाजारपेठेत, Nissan कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये Magnite Facelift विक्रीसाठी ऑफर करते. कंपनी त्यांच्या सीएनजी व्हेरिएंट म्हणून Visia CNG ऑफर करते. जर तुम्ही देखील या एसयूव्हीचा सीएनजी व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि फक्त 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून ही कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
संजय दत्तने खरेदी केली 4 कोटीची Mercedes Maybach GLS600, काय आहेत खास फिचर्स
निसान मॅग्नाइट फेसलिफ्टच्या सीएनजी व्हेरिएंट म्हणून Visia CNG ऑफर करते. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केले तर सुमारे 48 हजार रुपयांचा रोड टॅक्स आणि सुमारे 32 हजार रुपयांचा इंश्युरन्स भरावा लागेल. त्यानंतर निसान मॅग्नाइट व्हिजिया सीएनजीची रोड किंमत सुमारे 7.69 लाख रुपये होते.
जर तुम्ही निसान मॅग्नाइटच्या बेस वेरिएंट Visia खरेदी करत असाल, तर बँक तुमच्यासाठी फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज उपलब्ध करून देईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर उर्वरित रक्कम 6.69 लाख रुपये तुम्हाला बँकेतून फायनान्स करावी लागेल. बँकेकडून जर हे कर्ज 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी मिळाले, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे 10768 रुपयांचा EMI सात वर्ष भरावी लागेल.
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.69 लाखांचे कार लोन घेतले, तर सात वर्षे तुम्हाला दर महिन्याला 10768 रुपये EMI भरावी लागेल. या काळात तुम्हाला 2.35 लाख व्याज द्यावा लागेल. परिणामी, व्याज, एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमत धरून तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 10.04 लाख रुपये होईल.
ड्रायव्हिंग दरम्यान केल्यात 4 चुका, कार मायलेज येईल धाडकन खाली; सतत भरावे लागेल पेट्रोल
भारतीय बाजारात निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट ही Compact SUV सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये याची थेट स्पर्धा Hyundai Venue, Kia Sonet, Maruti Brezza, Mahindra XUV 3XO, Tata Nexon आणि Kia Syros यांच्याशी आहे.