फोटो सौजन्य: Social Media
पूर्वी कार घेणं हे प्रत्येकाला शक्य नव्हते. परंतु आज ईएमआयच्या मदतीने फक्त कारच नाही इतर अनेक गोष्टी सहजपणे खरेदी करता येतात, ईएमआयमध्ये आपण महिन्याला एका ठराविक रक्कम जमा करत असतो, जेणेकरून अनेकांना आपल्या बजेटच्या बाहेरील गोष्टी सुद्धा खरेदी करता येतात. ईएमआयमुळेच आज प्रत्येक सामान्य व्यक्तीला आपली हक्काची कार घेणे शक्य झालं आहे.
देशात मारुती सुझुकी अनेक उत्तम कार्स ऑफर करत असते. त्यांची ग्रँड विटारा कार ही एसयूव्ही सेगमेंटमधील एका उत्तम कार आहे, जिला मार्केटमध्ये उत्तम मागणी सुद्धा मिळताना दिसत आहे. जर तुम्ही या कारचे बेस व्हेरियंट सिग्मा खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि रु. 2 लाख डाउन पेमेंट केल्यानंतर कार घरी आणण्यासाठी इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
येत्या नववर्षात BMW चा ग्राहकांना झटका, नेमके कारण काय जाणून घ्या
ग्रँड विटारा ही कार मारुतीने चार मीटरपेक्षा मोठी एसयूव्ही म्हणून आणली आहे. या एसयूव्हीचा बेस व्हेरियंट, सिग्मा, कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 10.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर ऑफर केली आहे. जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर सुमारे 110730 रुपयांचा आरटीओ आणि सुमारे 37 हजार रुपयांचा इंश्युरन्स भरावा लागेल. याशिवाय तुम्हाला टीसीएस चार्ज म्हणून 10990 रुपये, एमसीडीसाठी 4000 रुपये आणि फास्टॅगसाठी 800 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर मारुती ग्रँड विटारा सिग्मा ऑन रोड किंमत जवळपास 12.63 लाख रुपये होईल.
जर तुम्ही या कारचे सिग्मा व्हेरियंट विकत घेणार असाल तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 10.63 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 10.63 लाख रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17102 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 10.63 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17102 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला सात वर्षांत मारुती ग्रँड विटारा सिग्मासाठी सुमारे 3.73 लाख रुपये व्याज म्हणून मोजावे लागतील. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 16.36 लाख रुपये असेल.
मारुतीने देऊ केलेली ही एसयूव्ही थेट टोयोटा अर्बन क्रूझर हैदर, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, टाटा हॅरियर, महिंद्रा स्कॉर्पिओ यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करते.