फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यात सर्वात पहिले नाव मारुती सुझुकीचे येते. गेल्या 25 वर्षांपासून Maruti Suzuki Wagon R ही भारतीय ग्राहकांची पहिली पसंती ठरत आली आहे. नुकतेच कंपनीने ही कार आणखी सुरक्षित करण्यासाठी यात 6 एअरबॅग्स स्टँडर्ड फीचर म्हणून समाविष्ट केले आहेत. त्यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंब असो की ऑफिसला जाणारी मंडळी, ही कार सर्वांसाठी उत्तम पर्याय मानला जाते.
राजधानी दिल्लीमध्ये Wagon R चा बेस LXI पेट्रोल व्हेरिएंट 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतो. RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्क धरल्यावर ऑन-रोड किंमत सुमारे 6.30 लाख रुपये इतकी होते. ही किंमत व्हेरिएंट आणि शहरानुसार बदलू शकते.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि बँकेकडून लोन मंजूर झाले, तर फक्त 50,000 डाउन पेमेंट भरून Wagon R खरेदी करता येते. उरलेल्या रकमेपोटी सुमारे 5.80 लाखांचे कार लोन घ्यावे लागेल. उदाहरणार्थ, हे लोन 9% व्याजदराने 5 वर्षांच्या कालावधीसाठी घेतल्यास मासिक EMI अंदाजे 12,000 इतकी येईल. ही EMI मध्यमवर्गीय कुटुंब आणि पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी परवडणारी मानली जाते.
Wagon R मध्ये 3 इंजिन ऑप्शन्स मिळतात, 1.0L पेट्रोल, 1.2L पेट्रोल आणि 1.0L पेट्रोल + CNG. पेट्रोल व्हर्जन 25.19 km/l पर्यंत मायलेज देते, तर CNG व्हर्जन तब्बल 34.05 km/kg पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनचे पर्याय दिले आहेत, ज्यामुळे ही कार शहरात तसेच हायवेवरही सहज चालवता येते.
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा Nissan Magnite SUV चा CNG व्हेरिएंट, एवढाच असेल EMI?
फीचर्सकडे पाहिले तर Wagon R मध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे, जे Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करते. यात कीलेस एंट्री, पावर विंडोज आणि 341L बूट स्पेस देखील मिळते. सेफ्टीच्या दृष्टीने आता ही कार आणखी मजबूत झाली असून यात 6 एअरबॅग्स स्टँडर्ड आहेत. याशिवाय ABS + EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर कॅमेरा यासारखे आधुनिक सेफ्टी फीचर्स देखील दिली गेली आहेत.