मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडे असणाऱ्या 'या' कारची वेगळीच क्रेझ
देशात असा एकही व्यक्ती नसेल ज्याने सचिन तेंडुलकरचे नाव ऐकले किंवा वाचले नसेल. सचिनच्या नावावर अनेक रेकॉडर्स असण्यासोबतच काही कार्स देखील आहेत, ज्यांची किंमतच कोटींच्या घरात आहे. अशीच एक कार म्हणजे Lamborghini Urus S.
क्रिकेटचा देव मानला जाणारा Sachin Tendulkar हा फक्त मैदानावरच नव्हे, तर कार्सच्या आवडीसाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याला मुंबईच्या रस्त्यांवर त्यांच्या मॉडिफाइड Lamborghini Urus S मध्ये फिरताना पाहण्यात आलं. या आलिशान एसयूव्हीची किंमत सुमारे 4.2 कोटी रुपये आहे. मात्र, सचिन यांनी यात केलेल्या आफ्टरमार्केट मॉडिफिकेशन्समुळे कारला आणखी दमदार आणि स्पोर्टी लुक मिळाला आहे.
September 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 3 नवीन कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सचिनची Lamborghini Urus S Blue Eleos शेडमध्ये आहे, जी प्रीमियम लूक देते. त्याने ही एसयूव्ही 2023 मध्ये खरेदी केली होती, परंतु आता त्यात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी त्यात स्टँडर्ड सिल्व्हर अलॉय व्हील्स होते, जे आता 22-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्सने बदलले आहेत. याशिवाय, त्यात कार्बन फायबर विंग, फ्रंट स्प्लिटर, साइड स्कर्ट आणि रिअर डिफ्यूसर बसवण्यात आले आहेत, जे त्याला आणखी स्पोर्टी लूक देतात.
लॅम्बोर्गिनी उरुस एस ही केवळ एक लक्झरी एसयूव्ही नाही तर कामगिरीच्या बाबतीतही ती सुपरकारपेक्षा कमी नाही. यात 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 666 पीएस पॉवर आणि 850 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे. हेच कारण आहे की ही एसयूव्ही फक्त 3.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते.
हे पहिल्यांदाच नाही की सचिन तेंडुलकर यांनी आपली कार मॉडिफाय करून घेतली आहे. यापूर्वी त्यांच्या Porsche 911 Turbo S ला Techart बॉडीकिट आणि Satin Black फिनिश देण्यात आले होते.
सचिन तेंडुलकर यांचा कार कलेक्शन अत्यंत आलिशान आहे. गेल्या वर्षी त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची Range Rover SV Autobiography खरेदी केली होती. ही कार Sedona Red शेडमध्ये असून तिच्या इंटिरिअरला खास Red Alcantara फिनिश दिली आहे. कारच्या सीट्सवर त्यांचा पर्सनल लोगोही आहे, ज्यामुळे ती आणखीच वेगळी व आकर्षक भासते. यामध्ये 24-वे अॅडजस्टेबल एक्झिक्युटिव सीट्स, 13.1-इंच स्क्रीन आणि Meridian 3D साउंड सिस्टमसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.