फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातही सर्वात जास्त मागणी ही टाटा मोटर्सच्या कार्सना असते. टाटाने भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.
टाटाने एसयूव्ही विभागात सुद्धा दमदार कार ऑफर केल्या आहेत. Tata Punch ही त्यातीलच एक लोकप्रिय कार. कंपनीने ही विविध व्हेरिएंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे. या कारच्या CNG व्हेरिएंटला तर नेहमीच ग्राहकांमध्ये चांगली मागणी मिळते. जर तुम्ही सुद्धा ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
चला जाणून घेऊयात, जर तुम्ही Tata Punch CNG च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल.
Hyundai, Tata की Maruti? जून 2025 मध्ये कोणती Sub-4 मीटर एसयूव्ही होती नंबर 1?
टाटा पंच एसयूव्ही पेट्रोल आणि सीएनजी इंजिनसह येते. Pure हे सीएनजी इंजिनसह बेस व्हेरिएंट म्हणून ऑफर केले जाते. या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट 7.30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर हा व्हेरिएंट दिल्लीमध्ये खरेदी केलाअसेल, तर 7.30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह, त्यावर नोंदणी आणि विमा देखील भरावा लागेल.
ही कार खरेदी करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 58 हजार रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स आणि सुमारे 35 हजार रुपये इंश्युरन्स द्यावा लागेल. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये वाहनाची ऑन-रोड किंमत 8.23 लाख रुपये होईल.
जर तुम्ही टाटा पंचचा सीएनजी इंजिन असलेला बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 6.23 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर तुम्हाला बँकेकडून 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 6.23 लाख रुपये दिले गेले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 10029 रुपये EMI भरावा लागेल.
अरेरेरे किती वाईट ! Fortuner सोबत भिडायला गेलेल्या ‘या’ SUV ला एका सुद्धा ग्राहकाने खरेदी केले नाही
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.23 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 10029 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला टाटा पंच सीएनजीच्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 2.19 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 10.42 लाख रुपये असेल.