फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच कार ऑफर करताना अनेक ऑटो कंपन्या ग्राहकाची मागणी आणि आवश्यकतेचा विचार करून वाहने ऑफर करत असतात. यामुळेच तर काही कंपन्यांच्या कार्सचे हजारो युनिट्सची विक्री एका फटक्यात होत असते. मात्र, सगळ्याच कार मार्केटमध्ये सुपरहिट होतात असे नाही. काही कारकडे तर ग्राहक मागे वळूनही पाहत नाही. आज आपण अशाच एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिला June 2025 मध्ये एका ग्राहकाने सुद्धा खरेदी केले नाही !
जून 2025 मध्ये Nissan X-Trail च्या विक्रीत मोठा बदल झाला. कारण जूनच्या महिन्यात या कारचे एकही युनिट विकले गेले नाही. मे 2025 मध्ये या कारचे फक्त 20 युनिट विकले गेले होते, तर जूनमध्ये विक्री शून्य होती. यावरून स्पष्ट होते की निसान एक्स-ट्रेल सध्या भारतीय ग्राहकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करू शकलेली नाही. या सेगमेंटमध्ये ही कार टोयोटा फॉर्च्युनरशी स्पर्धा करते.
‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज
निसान एक्स-ट्रेलची 2025 या वर्षातील विक्री पाहता सुरुवातीचे महिने म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गाडीची एकही युनिट विकली गेली नाही. मात्र मार्च 2025 मध्ये या मॉडेलने 15 युनिट्सची विक्री नोंदवून आपली उपस्थिती दाखवली. एप्रिल महिन्यात या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून 76 युनिट्सची नोंद झाली. मात्र मे महिन्यात ही संख्या घसरून 20 वर आली आणि पुन्हा जून 2025 मध्ये विक्री पूर्णपणे थांबली. अशाप्रकारे, एक्स-ट्रेलच्या विक्रीत सातत्याचा अभाव दिसून येतो आहे, ज्यावरून ग्राहकांचा प्रतिसाद सध्या स्थिर नसल्याचे स्पष्ट होते.
फक्त ‘एवढ्या’ किमतीत Tesla Model Y आणाल घरी, ‘असा’ असेल डाउन पेमेंट आणि EMI चा हिशोब
मर्यादित ब्रँड प्रेझेन्स: निसान सध्या भारतात मर्यादित सेगमेंटमधील मॉडेल्स विकत आहे, ज्यामुळे तिचे ब्रँड रिकॉल कमकुवत झाले आहे.
कठीण स्पर्धा: एक्स-ट्रेल ज्या प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये येते त्यात आधीच टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर, स्कोडा कोडियाक आणि ह्युंदाई टक्सन सारख्या कार्सचे वर्चस्व आहे.
किंमत: कदाचित एक्स-ट्रेलची किंमत त्याच्या फीचर्स आणि ब्रँड व्हॅल्यूपेक्षा जास्त असल्याचे जाणवले, ज्यामुळे खरेदीदार निराश झाले.