
फोटो सौजन्य: Pinterest
नव्या Punch Facelift ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू होऊन 10.54 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी ही कार Smart, Pure, Pure+, Pure+ S, Adventure, Adventure S, Accomplished आणि Accomplished+ S अशा एकूण आठ ट्रिम्समध्ये उपलब्ध करून देत आहे.
‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!
2026 Tata Punch Facelift मध्ये आता अधिक पॉवर आणि पर्याय मिळतात. यामध्ये नव्याने 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. याशिवाय, आधीपासून उपलब्ध असलेले 1.2-लीटर नॅचरलि ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिनही कायम ठेवण्यात आले आहे, ज्यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT असे दोन्ही पर्याय मिळतात.
मायलेजला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी ट्विन-सिलेंडर CNG किट आणि नवीन CNG-AMT कॉम्बिनेशनही देण्यात आले असून, त्यामुळे ही कार रोजच्या वापरासाठी अधिक किफायतशीर ठरते.
जर तुम्ही 2026 Tata Punch Facelift खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कोणता व्हेरिएंट पैशाच्या दृष्टीने योग्य ठरेल याबाबत संभ्रमात असाल, तर Accomplished+ S ट्रिम हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. टॉप-एंड व्हेरिएंट असूनही, फीचर्स, सेफ्टी आणि पॉवरट्रेनच्या बाबतीत हा संतुलित पॅकेज देतो. यामध्ये आवश्यक तसेच प्रीमियम दोन्ही प्रकारची फीचर्स मिळत असल्याने वेगळे अपग्रेड करण्याची गरज भासत नाही.
Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत
1.2-लीटर नॅचरलि ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह Accomplished+ S व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये आहे. त्याच व्हेरिएंटचा AMT ट्रान्समिशनसह पर्याय 9.54 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
जर कमी खर्चात क्लचलेस ड्रायव्हिंग आणि उत्तम मायलेज तुमची प्राथमिकता असेल, तर CNG-AMT ऑप्शन 10.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये मिळतो. अधिक पॉवरची गरज असलेल्या ग्राहकांसाठी 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल व्हेरिएंट 9.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किमतीत उपलब्ध आहे.