फोटो सौजन्य: Gemini
हा बदल विशेषतः त्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा आहे, जे 1.5 TSI मॅन्युअल व्हेरिएंट त्याच्या रेस्पॉन्सिव ड्रायव्हिंग अनुभवासाठी आणि तुलनेने परवडणाऱ्या किमतीसाठी पसंत करत होते. या निर्णयानंतर ग्राहकांसाठी काय बदलले आहे, ते पाहूया.
Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत
आतापर्यंत Virtus आणि Taigun या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.5 TSI इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध होता, जो ड्रायव्हिंग एन्थुजिअस्ट्समध्ये लोकप्रिय होता. मात्र आता हा पर्याय हटवल्यामुळे 1.5 TSI इंजिन फक्त 7-स्पीड DSG गिअरबॉक्ससहच मिळणार आहे.
Virtus 1.5 TSI मॅन्युअल: 17.09 लाख रुपये
Taigun 1.5 TSI मॅन्युअल: 17.04 लाख रुपये
आता मॅन्युअल व्हेरिएंट बंद झाल्याने 1.5 TSI खरेदी करायची असल्यास DSG/DCT व्हेरिएंट घ्यावा लागणार आहे.
GT Plus Chrome DCT
Virtus: 18.80 लाख रुपयांपासून
Taigun: 18.95 लाख रुपयांपासून
GT Plus Sport DCT
Virtus: 19 लाख रुपये
Taigun: 19.19 लाख रुपये
यावरून स्पष्ट होते की मॅन्युअल पर्याय बंद झाल्याने 1.5 TSI साठीचा एंट्री प्राइस पॉइंट वाढला असून, ग्राहकांचा बजेट थोडा जास्त होणार आहे.
Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स
Volkswagen चे 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पूर्वीप्रमाणेच 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल आणि DSG दोन्ही व्हेरिएंट्समध्ये परफॉर्मन्सचे आकडे समान आहेत. मात्र, आता मॅन्युअल कंट्रोल पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी पर्याय उपलब्ध राहिलेला नाही.
हा निर्णय कंपनीने मुख्यतः बिझनेस एफिशिएंसी वाढवण्यासाठी घेतल्याचे मानले जाते. 1.5 TSI मॅन्युअल व्हेरिएंट्स मर्यादित ग्राहकांनाच आकर्षित करत होते, त्यामुळे त्यांची विक्री तुलनेने कमी होती, असेही एक कारण असू शकते.
विशेष म्हणजे हा निर्णय Skoda च्या धोरणाशी सुसंगत आहे. Skoda ने आधीच Slavia आणि Kushaq या मॉडेल्समधून 1.5 TSI मॅन्युअल व्हेरिएंट सप्टेंबर 2024 मध्ये बंद केला होता. आता Volkswagen नेही Virtus आणि Taigun मध्ये तोच मार्ग स्वीकारला आहे.






