खरंच छोट्या कारवरील GST कमी होणार? (फोटो सौजन्य: iStock)
आपली ड्रीम कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, ज्यावेळी आपण आपली ड्रीम कार खरेदी करतो तेव्हा कारची एक्स शोरूम किंमत आणि ऑन रोड किंमत यात मोठा फरक जाणवतो. ऑन रोड किमतीत टॅक्स समाविष्ट झाल्याने कार खरेदीदारांना अधिकचे पैसे द्यावे लागतात. यामुळेच तर अनेक जण वाढीव GST मुळे त्रस्त आहेत. मात्र, आता केंद्र सरकार GST मध्ये कपात करणार अशी चर्चा रंगली आहे.
ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी भारतातील ऑटोमोबाईल उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात गणेश चतुर्थी, ओणम, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि धनतेरस यांसारख्या सणांच्या मुहूर्तावर कार व दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून येते. वार्षिक एकूण विक्रीपैकी जवळपास ३० ते ४० टक्के विक्री ही याच फेस्टिव्हल सिझनमध्ये होते. त्यामुळेच वाहन कंपन्या या काळात आकर्षक ऑफर्स जाहीर करतात आणि नवीन मॉडेल्स बाजारात आणतात.
फुल्ल टॅंकवर 1200 KM ची रेंज! Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती असावा पगार?
खरं तर, या वर्षीचा फेस्टिव्ह सिझन अजूनच महत्त्वाचा आहे कारण सरकार छोट्या कारवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर कारच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. मात्र, सरकारने अद्याप कोणती वाहने आणि किती टॅक्स कमी करायचा हे ठरवलेले नाही. त्यामुळेच कार खरेदी करावी की करू नये? असा प्रश्न विचारला जात आहे.
अनेक डीलर्सचे म्हणणे आहे की GST संदर्भातील चर्चेमुळे ग्राहक गोंधळात पडले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील एका डीलरनुसार, ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत मागणी चांगली होती. मात्र आता खरेदीदार बुकिंग करण्यापेक्षा GST कपातीबद्दल चौकशी अधिक करत आहेत. आताच कार घेतली आणि दिवाळीपर्यंत टॅक्स कमी झाल्यास नुकसान होईल या भीतीमुळे लोक खरेदी पुढे ढकलत आहेत.
दुसरीकडे, डीलर्सचीही अडचण वाढली आहे. विद्यमान स्टॉकवर आधीच टॅक्स भरलेला आहे. जीएसटी कपात लागू झाली तर नव्या विक्रीवर कमी टॅक्स लागेल. त्यामुळे आधी विकत घेतलेला स्टॉक तुलनेने महाग ठरू शकतो तसेच वर्किंग कॅपिटल आणि व्याजाचा भारही वाढू शकतो. याच कारणामुळे अनेक डीलर्स जास्त मागणी असलेल्या मॉडेल्सचे मर्यादित प्रमाणात स्टॉक ठेवत आहेत.
Honda Elevate Vs Maruti Grand Vitara फीचर्स, मायलेज आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार आहे सुपर बेस्ट?
जर सरकारने खरोखरच GST कमी केला तर ग्राहकांना कारच्या किमतीत मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तात्काळ कारची आवश्यकता असेल, तर सध्याच्या ऑफर्स आणि फायनान्स प्लॅनचा फायदा घेणे शहाणपणाचे ठरेल, परंतु जर तुम्ही वाट पाहू शकत असाल, तर दिवाळीपूर्वी GST बाबत सरकारची घोषणा पाहणे चांगले.