फोटो सौजन्य: @carandbike/ X.com
भारतात अनेक उत्तम कार निर्मात्या कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. कंपनीने नेहमीच भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि बजेटनुसार चांगल्या कार ऑफर केल्या आहेत. Maruti Grand Vitara ही त्यातीलच एक कार.
भारतीय मार्केटमध्ये मारुती ग्रँड विटारा हायब्रिडला जास्त मागणी आहे. ही कार उत्तम मायलेज, आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट रस्त्यावरील प्रेझेन्ससाठी ओळखली जाते. मारुती विटारा ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात इंधन कार्यक्षम एसयूव्हींपैकी एक आहे. जर तुम्ही ग्रँड विटारा हायब्रिड घरी आणण्याचा विचार करत असाल, तर त्याची ऑन-रोड किंमत आणि फायनान्स प्लॅन जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मारुती ग्रँड विटारा हायब्रिडच्या मजबूत हायब्रिड व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 16.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर ऑन-रोड किंमत सुमारे 19.36 लाख रुपये असेल. यामध्ये आरटीओ चार्जेस, विमा रक्कम आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत.
Tata Harrier EV चा ‘हा’ फिचर सुरु झाला अन् होत्याचं नव्हतं झालं! अगदी काही सेकंदातच गमावला जीव
जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटसाठी फायनान्स केले तर तुम्ही 4.36 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन ती खरेदी करू शकता. त्यानंतर, उर्वरित 15 लाख रुपयांमधून तुम्हाला बँकेकडून कार लोन घ्यावे लागेल. जर तुम्हाला हे लोन 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घ्यायचे असेल, तर तुम्हाला दरमहा 25 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. जर तुमचा महिन्याचा पगार 60 ते 70 हजार असेल, तर तुम्ही ग्रँड विटाराचे लोन सहजपणे फेडू शकता.
मारुती ग्रँड विटारा हायब्रिड SUV मध्ये अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. Electronic Stability Program (ESP) मुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते. यामध्ये ABS आणि EBD सोबतच पुढील व मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स दिलेले असून, ते अधिक चांगले ब्रेकिंग सुनिश्चित करतात. मुलांच्या सुरक्षेसाठी ISOFIX चाइल्ड सीट अँकर्सचीही सुविधा उपलब्ध आहे.
या कार खास वैशिष्ट्य म्हणजे, जर आपण तिचा स्ट्रॉन्ग हायब्रिड मॉडेल विकत घेतला, तर त्यामध्ये 45 लिटरचा फ्युएल टँक मिळतो. तो फुल केल्यास ही कार सहजपणे 1200 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.