Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील सर्वात युवा आमदाराची सगळीकडेच चर्चा, खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार

भारतातील तरुण नेत्यांनाही आकर्षक दिसणाऱ्या कार खरेदी करण्याची आवड आहे. देशातील सर्वात तरुण आमदाराने नुकतीच लाँच झालेली मर्सिडीज इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2025 | 06:10 PM
भारतातील सर्वात युवा आमदाराची सगळीकडेच चर्चा, खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार

भारतातील सर्वात युवा आमदाराची सगळीकडेच चर्चा, खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार

Follow Us
Close
Follow Us:

देशातील नेत्यांना नेहमीच आकर्षक आणि आलिशान कार आपल्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट करण्याची आवड असते. यात तरुण नेते सुद्धा कमी नाहीत. यातही खासकरून मर्सिडीजच्या कार फक्त नेत्यांनाच नाही तर अनेक सेलिब्रेटी मंडळींना सुद्धा भुरळ पाडत असतात. आजही रस्त्यांवर मर्सडिजची कार दिसली की अनेकांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. अशीच एक मर्सडिजची इलेक्ट्रिक कार भारतातील सर्वात तरुण आमदाराने विकत घेतली आहे, ज्यामुळे सगळीकडे याची चर्चा रंगली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

मर्सिडीज-बेंझने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रसिद्ध G-Wagen चे इलेक्ट्रिक व्हर्जन, G580 EQ लाँच केले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीने त्याच्या पॉवरफुल लूक आणि फीचर्समुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच भारतातील सर्वात तरुण आमदार रोहित मयनामपल्ली हे या कारचे पहिले खरेदीदार बनले आहेत. डॉ. रोहित मयनामपल्ली तेलंगणाच्या राजकारणात खूप सक्रिय आहेत. तेलंगणातील या आमदाराच्या कारचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा लूक

रोहित मयनामपल्ली यांनी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही डीप ब्लॅक कलरमध्ये खरेदी केली आहे. या इलेक्ट्रिक कारचा लूक जी-वॅगनच्या आयसीई व्हर्जन सारखेच आहे. या कारचे फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प आणि बंपर G63 आणि G400d सारखे आहेत. या एसयूव्हीच्या बॉक्सी डिझाइनमध्ये वाहन उत्पादकांनी कोणताही बदल केलेला नाही.

G580 EQ EV फीचर्स

या मर्सिडीज कारच्या प्रीमियम फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात दोन 12.3-इंच डिस्प्ले आहेत. यापैकी एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आहे आणि दुसरा या कारचा इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल सीट्स देण्यात आल्या आहेत. या ईव्हीमध्ये मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हीट आणि कूल सीट्स सारखी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.

मर्सिडीजच्या ईव्हीची रेंज किती?

मर्सिडीज-बेंझ G580 EQ च्या ICE व्हर्जनप्रमाणे, ही इलेक्ट्रिक कार ऑफ-रोडिंगसाठी देखील डिझाइन करण्यात आली आहे. या कारमध्ये चारही चाकांसाठी चार मोटर्स आहेत. G580 EQ मध्ये 116 kWh बॅटरी पॅक आहे, जो 587 PS पॉवर निर्माण करतो आणि 1,164 Nm टॉर्क जनरेट करतो. मर्सिडीजच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीची सर्टिफाइड रेंज 473 किलोमीटर आहे.

G580 EQ च्या इलेक्ट्रिक व्हेरियंटची किंमत

या मर्सिडीज कारमध्ये फास्ट चार्जिंग फीचर आहे, ज्याच्या मदतीने ही कार अवघ्या 32 मिनिटांत चार्ज करता येते. ही कार फक्त पाच सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या कारचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे. मर्सिडीजच्या या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे.

Web Title: Youngest mla of india rohith mynampally has bought mercedes benz g580 eq electric suv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • Mercedes car
  • Telangana

संबंधित बातम्या

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
1

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश

अमेरिका आणि इटलीच्या नाकावर टिचून ‘हा’ देश बनला Luxury Cars चा बादशाह, जगभरात वाजतोय डंका
2

अमेरिका आणि इटलीच्या नाकावर टिचून ‘हा’ देश बनला Luxury Cars चा बादशाह, जगभरात वाजतोय डंका

ऑटोकार इंडिया-मर्सिडीज-बेंझ इंडियाने EV द्वारे तापमानात केला सर्वात मोठा बदल साध्य; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव
3

ऑटोकार इंडिया-मर्सिडीज-बेंझ इंडियाने EV द्वारे तापमानात केला सर्वात मोठा बदल साध्य; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव

दिल्लीत ‘या’ नियमामुळे कवडीमोल भावात विकली गेली Mercedes, कार मालकाची उडाली झोप
4

दिल्लीत ‘या’ नियमामुळे कवडीमोल भावात विकली गेली Mercedes, कार मालकाची उडाली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.