relationship
आज नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. एक काळ होता जेव्हा नात्यांसाठी सर्व काही त्यागण्याची, सहन करण्याची ताकद होती. पण काळ गेला वेळ ही गेली. आज छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब ठेवला जातो. मी इतके कॉल आणि मेसेज केले पण समोरच्याने एकही नाही केला, असा ही हिशोब मांडला जातो. त्यावरून ही वाद व्हायला सुरुवात होते. सकाळची सुरुवात कोण ‘गुड मॉर्निंग’चा मेसेज पहिले करतो याची सुद्धा वाट बघितली जाते. किती क्षुल्लक गोष्टींची नोंद ठेवली जाते. पण प्रत्येक नात्यासाठी आपण किती केलंय याचा पाठपुरावा करायला हवा.
हल्ली पैसे काढायचे असतील तर आपलं बँकेत जाणं होत नाही. बँकांनी आता एटीएम कार्डची सेवा, सुविधा ग्राहकांना सहज उपलब्ध करून दिली आहे. एटीएममध्ये गेल्यावर आपण काय करतो? तर आपलं कार्ड काढतो, कार्ड मशिनमध्ये टाकतो. आपला पासवर्ड क्रमांक दाबतो, रक्कम टाकतो. मग मशिनचा खडखड असा आवाज येतो आणि पैसे बाहेर येतात. बरोबर ना? पण जर, एटीएममध्ये गेल्यावर कार्ड काढलं, कार्ड मशिनमध्ये टाकलं, आपला पासवर्ड दाबला, रक्कम टाकली, मग मशिनचा खडखड असा आवाज आला आणि पैसे आलेच नाहीत; मग पुन्हा कार्ड मशिनमध्ये टाकलं, पासवर्ड क्रमांक दाबला, रक्कम टाकली पुन्हा मशिनचा खडखड असा आवाज आला आणि पैसे आलेच नाहीत. का? का? असं का झालं?