Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

अहिल्यानगरमधील राहाता आणि शिर्डी उपविभागात अनेक शासकीय इमारती उभ्या राहिल्या. मात्र इमारतींमध्ये काम करायला पुरेसे पोलिस बळ आहे का? हा खरा प्रश्न.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 09:00 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

समीर बेग/ अहिल्यानगर: राहाता – शिर्डी उपविभागात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या शासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. आधुनिक पोलिस ठाणे, प्रशासकीय कार्यालये आणि विमानतळ परिसरातील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा कागदोपत्री सक्षम दिसत असली, तरी प्रत्यक्षात या भव्य इमारतींमध्ये काम करण्यासाठी पुरेसे पोलिस बळ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या उपविभागीय कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, शिर्डी, लोणी आणि पुणतांबा या महत्त्वाच्या गावांचा समावेश होतो. धार्मिक, व्यापारी आणि वाहतूकदृष्ट्या हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. विशेषतः शिर्डी येथे देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येतात. विमानतळ सुरू झाल्यापासून व्हीआयपी भेटी, प्रोटोकॉल ड्युटी, सुरक्षा तपासण्या आणि वाहतूक नियंत्रणाचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे.

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

राहाता व कोपरगाव तालुक्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६ लाखांच्या आसपास आहे. त्यात शिर्डीतील दैनंदिन भाविकांची गर्दी, उत्सव काळातील लाखोंची उपस्थिती आणि संभाव्य कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी संख्या लक्षात घेतली तर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. सध्या शिर्डी उपविभागात सरासरी ३०० पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. म्हणजे अंदाजे २ हजार नागरिकांमागे १ पोलिस अशी स्थिती आहे. शिफारस केलेल्या प्रमाणानुसार ६ लाख लोकसंख्येसाठी किमान ७५० पोलिसांची आवश्यकता आहे. म्हणजेच जवळपास निम्मे मनुष्यबळ अपुरे असल्याचे चित्र दिसते.

अतिरिक्त ताणाचा कार्यक्षमतेवर परिणाम

व्हीआयपी प्रोटोकॉल, वाढती गुन्हेगारी, तपासकामे, न्यायालयीन प्रक्रिया, वाहतूक नियंत्रण आणि विमानतळ सुरक्षा या सर्व जबाबदाऱ्यांमुळे पोलिस दलावर प्रचंड ताण आहे. कामाचे तास वाढणे, सुट्ट्या कमी होणे आणि सततची ड्युटी यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी होमगार्ड व इतर यंत्रणांची मदत घेतली जात असली, तरी कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.

Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय धार्मिक केंद्रासाठी सक्षम सुरक्षा गरजेची

सरकारने आधुनिक इमारती, सीसीटीव्ही, वाहने आणि उपकरणांची उपलब्धता वाढवली आहे. मात्र विकासाचा खरा अर्थ केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. धार्मिक पर्यटनाचे जागतिक केंद्र असलेल्या शिर्डीत सुरक्षा यंत्रणा संख्येने आणि क्षमतेने सक्षम असणे अत्यावश्यक आहे.

सुचविलेले उपाय

  • लोकसंख्येच्या प्रमाणात तातडीने पोलिस भरती
  • मोठ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी विशेष पथक
  • शिर्डी विमानतळ व व्हीआयपी प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र मनुष्यबळ
  • ताण कमी करण्यासाठी शिफ्ट पद्धतीचे काटेकोर पालन

Web Title: Ahilyanagar news when will the police recruitment be held in rahat and shirdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Police Recruitment

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई
1

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं
2

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप
3

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड
4

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.