Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालणे की धावणे योग्य?

  • By साधना
Updated On: Jul 30, 2023 | 06:00 AM
running

running

Follow Us
Close
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी मी चालावे की धावावे, कोणता चांगला पर्याय आहे? माझ्या आरोग्यासाठी चालण्यापेक्षा धावणे हा चांगला पर्याय आहे का? हे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात; कारण अनेकांना अजूनही फिरायला जावे की धावायला जावे याची खात्री नसते. तर, आज कोणता पर्याय सर्वोत्तम आहे याबद्दल चर्चा करू. चालणे आणि धावणे हे दोन्ही हृदयासाठी उत्कृष्ट व्यायाम आहेत. कोणतीही शारीरिक क्रिया जी तुमची हृदयगती त्याच्या सामान्य स्थितीपेक्षा वाढवते, ती कार्डिओचा एक प्रकार आहे.

तथापि, त्यांच्यात थोडा फरक आहे. प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही व्यायामासाठी नवीन असाल तर चालणे हा पहिला पर्याय आहे. कारण तुमच्या शरीराला ताकद मिळण्यासाठी वेळ लागतो. जसजसे तुम्ही शक्ती मिळवाल तसतसे तुम्ही तुमचा वेग वाढवू शकता आणि धावणे सुरू करू शकता.

चालणे आणि धावणे करण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
● अतिरिक्त कॅलरी जाळण्यात किंवा वजनाचा समतोल राखण्यात मदत करते.
● सहनशक्ती वाढवण्यास मदत करते.
●रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
● दीर्घकालीन परिस्थिती टाळण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यात मदत करते.
●तुमचे हृदय मजबूत करते.
●दीर्घ आयुष्य जगण्यात मदत होऊ शकते.

आपल्या मनातील प्रश्नांची तीन भागात विभागणी करूया…
वजन कमी करण्यासाठी – चालणे ही वजन कमी करण्याचा प्रारंभिक टप्पा आहे. धावण्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. असे का? याचे कारण असे की धावण्यामुळे तुमची चयापचय चालण्यापेक्षा जास्त वाढते, ज्यामुळे जास्त कॅलरीजचा वापर होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही धावपटूप्रमाणे वेगाने चालत जाऊ शकता, पण फरक तुमच्या पायांच्या वेगात आहे. धावताना एका पायाचा आधार जमिनीवर सोडू शकतो, तर चालताना एक पाय नेहमी जमिनीवर असावा. त्यामुळे, चालण्याचा प्रभाव धावण्याच्या तुलनेत थोडा कमी असतो. परंतु, तुमचे वजन जास्त असल्यास, तुमच्या सांध्यांवर आधीच खूप ताण असतो. त्यामुळे हळूहळू चालण्याने वजन कमी करणे अधिक चांगले होईल. यामुळे तुमच्या सांध्यांवर जास्त ताण पडणार नाही.

हृदयगती – हृदयगतीदेखील एक प्रमुख घटक आहे. १०० पावले प्रतिमिनिट वेगाने चालणे तुमच्या हृदयाचे ठोके प्रतिमिनिट १०० बीट्सपर्यंत वाढवते, तर धावणे हे १२०-१३० बीट्स प्रतिमिनिटपर्यंत वाढवते. परिणामी, दीर्घकाळ वेगाने धावल्याने एड्रेनालाईनमध्ये वाढ होऊ शकते, तसेच रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होऊ शकते. अशा परिस्थितीत, कार्डिओमुळे मिळणारे सर्व आरोग्य फायदे मिळविण्यासाठी मंदगतीने चालणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

वयाच्या दृष्टीकोनातून – मी सुचवेन की, जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसे आपण धावण्याऐवजी चालणे पसंत केले पाहिजे. लोकांच्या वयाप्रमाणे स्नायू आणि हाडे क्षीण होतात, त्यामुळे चालणे हा एक सुरक्षित पर्याय आहे. कारण यामुळे तुमच्या सांध्यांवर कमी ताण येतो आणि तुमच्या दुखापतीचा धोका कमी होतो. त्यामुळे या चर्चेतून तुम्ही ठरवले असेलच की तुम्ही काय निवडायचे, मग ते चालणे असो वा धावणे. लक्षात ठेवा की, सर्वकाही संयमाने केले पाहिजे. असे होऊ नये की तुमच्या आरोग्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल.
निरोगी रहा, आनंदी रहा…

– डॉ. हंसामाँ योगेंद्र
pranee@theyogainstitute.org

Web Title: Walking and running benefits nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Health Article

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Shravan 2025 : श्रावण महिन्यात कसा असावा आहार? काय सांगतं आयुर्वेद ?
2

Shravan 2025 : श्रावण महिन्यात कसा असावा आहार? काय सांगतं आयुर्वेद ?

Health News: पुण्यात दम्याच्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ: खोकला, सर्दीकडे दुर्लक्ष नको; तज्ज्ञांचा इशारा
3

Health News: पुण्यात दम्याच्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ: खोकला, सर्दीकडे दुर्लक्ष नको; तज्ज्ञांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.