Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 एकरात आंबा लागवड; शेतकरी करतोय वर्षाला 50 ते 60 लाखांची कमाई!

आंबा शेतीला महाराष्ट्रात मोठे महत्व प्राप्त झाले असून, विशेषतः कोकणात पिकणारा हापूस आंबा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. आज आपण १०० एकरात आंबा शेती करणाऱ्या एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या आंबा शेतीबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 19, 2024 | 06:50 PM
१०० एकरात आंबा लागवड, शेतकरी करतोय वर्षाला 50 ते 60 लाखांची कमाई!

१०० एकरात आंबा लागवड, शेतकरी करतोय वर्षाला 50 ते 60 लाखांची कमाई!

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात सध्या शेतकऱ्यांचा ओढा फळशेतीकडे वाढला आहे. ज्यामुळे अनेक जण पारंपारिक पिकांना फाटा देत फळ पिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना फळ शेतीमधून अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे १०० एकरातील आंबा लागवडीतून वार्षिक 50 ते 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

‘या’ आंबा वाणांची केलीये लागवड

मोहम्मद अलीम किदवई असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील नवाबगंज तालुक्यातील बयारा गावचे रहिवासी आहेत. आंबा हे सर्वांचेच आवडते फळ असते. हीच बाब लक्षात घेऊन शेतकरी मोहम्मद अलीम किदवई हे आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आंबा शेती करत आहे. त्यांनी सांगितले आपण आपल्या शेतीमध्ये दशेरी, लंगडा आणि चौसा या जातीच्या आंब्यांची लागवड केली आहे. आपले एकत्रित कुटुंब असून, कुटुंबातील सर्व जण मिळून शेती करतात.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी मोहम्मद अलीम किदवई सांगतात, बाजारात दशहरी, लंगडा आणि चौसा या जातीच्या आंब्यांना बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे अनेक वर्षांपासून आपण या जातीच्या लागवड केली आहे. एका हंगामात आपल्याला जवळपास 40 टन आंब्याचे उत्पादन मिळते. आपल्या शेतामध्ये उत्पादित सर्व आंबा आपण जवळच्या गोरखपुर, देवरिया जिल्ह्यांमध्ये पाठवतो.

इतकेच नाही तर शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये देखील आपला काही आंबा पाठवला जातो. याशिवाय काही मोठे व्यापारी हे दिल्ली आणि कोलकाता येथून देखील आपल्या आंब्याची खरेदी करतात. ज्यामुळे आपल्याला १०० एकरातील आंबा बागेतून वार्षिक 50 ते 60 लाख रुपयांचा नफा सहज मिळत असल्याचे ते सांगतात.

‘यंदा चांगल्या उत्पादनाचे संकेत’

दरम्यान, यंदाच्या हंगामाबाबत बोलताना शेतकरी मोहम्मद अलीम किदवई यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत वातावरण बदलामुळे आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. सध्या मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात होणार असून, 20 ते 25 जूनपर्यंत उत्तरप्रदेशात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. याशिवाय यंदा मॉन्सूनचा पाऊस समाधानकारक होणार आहे. ज्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे उत्पादन वाढले जाण्याची शक्यता आहे. अर्थात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास आंब्याच्या चवीमध्ये देखील वाढ होत असल्याचे ते शेवटी सांगतात.

Web Title: 100 acres of mango plantation farmer earning 50 to 60 lakhs a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 06:50 PM

Topics:  

  • Farmer Success Story
  • Mango Rate

संबंधित बातम्या

लंगडा आंब्याचा आणि लंगडेपणाचा संबंध काय? इतिहास या अनोख्या नावाचा
1

लंगडा आंब्याचा आणि लंगडेपणाचा संबंध काय? इतिहास या अनोख्या नावाचा

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा
2

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा

आंब्याच्या दरात मोठी घसरण! ग्राहकांना दिलासा, शेतकरी चिंतेत
3

आंब्याच्या दरात मोठी घसरण! ग्राहकांना दिलासा, शेतकरी चिंतेत

Saffron Mango : अमेरिकेत केशरला प्रथम पसंती, हापूसला टाकलं मागे
4

Saffron Mango : अमेरिकेत केशरला प्रथम पसंती, हापूसला टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.