Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता फेब्रुवारी महिन्याची गरज नाही! ४ महीने आधीच ‘हापूस’ची मार्केटमध्ये एन्ट्री; तब्बल २१ हजार…

Alphonso: हंगामाच्या तब्बल चार महिने आधी बाजारात आलेल्या या पहिल्या वहिल्या राजापूर/रत्नागिरी हापूस आंब्याचे पहिले मानकरी आणि ग्राहक होण्याचा मान कौस्तुभ दीक्षित यांनी मिळवला आहे. त्यांनी हा ऐतिहासिक आंबा २१ हजार रुपयांना खरेदी केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 05:39 PM
एका डझनाची किंमत तब्बल ५,२५० रुपये

एका डझनाची किंमत तब्बल ५,२५० रुपये

Follow Us
Follow Us:
  • एका डझनाची किंमत तब्बल ५,२५० रुपये
  • दत्ताराम दाजी पडयार यांच्या बागेत हा अवकाळी हापूस तयार
  • एका डझन आंब्यासाठी तब्बल ५,२५० रुपये इतका दर
रत्नागिरी / Alphonso रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा म्हटलं की, सहसा डोळ्यांसमोर येतो तो फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून सुरू होणारा आंब्याचा हंगाम! मात्र, यंदा निसर्गाची अनोखी साथ आणि बागायतदारांच्या मेहनतीमुळे हापूस आंब्याने तब्बल चार महिने आधीच बाजारपेठेत एन्ट्री घेत सर्वांनाच थक्क केले आहे. विशेष म्हणजे, या हंगामापूर्वी दाखल झालेल्या हापूसच्या पहिल्याच पेटीचा लिलाव तब्बल २१ हजार रुपयांच्या विक्रमी दराने झाला आहे.

एका डझनाची किंमत तब्बल ५,२५० रुपये

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील प्रयोगशील आंबा बागायतदार दत्ताराम दाजी पडयार यांच्या बागेत हा अवकाळी हापूस तयार झाला आहे. त्यांच्या बागेतील चार डझन (४८ नग) हापूस आंब्यांची पहिली पेटी रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी ‘सतीश पवार बंधू’ यांच्या मार्फत बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यात आली होती. या पहिल्यावहिल्या पेटीला २१ हजार रुपयांचा मोठा दर मिळाला. त्यामुळे हिशोब केल्यास एका डझन आंब्यासाठी तब्बल ५,२५० रुपये इतका दर मिळाला आहे, जो या मोसमातील सुरुवातीचा एक नवा विक्रम मानला जात आहे.

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात

कौस्तुभ दीक्षित ठरले पहिले ग्राहक

हंगामाच्या तब्बल चार महिने आधी बाजारात आलेल्या या पहिल्या वहिल्या राजापूर/रत्नागिरी हापूस आंब्याचे पहिले मानकरी आणि ग्राहक होण्याचा मान कौस्तुभ दीक्षित यांनी मिळवला आहे. त्यांनी हा ऐतिहासिक आंबा २१ हजार रुपयांना खरेदी केला.

व्यापारी व बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

सामान्यतः हापूस आंब्याची आवक फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चमध्ये वेगाने सुरू होते. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारातच बाजारात असा तयार आणि दर्जेदार हापूस उपलब्ध होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. एका बाजूला नियमित हंगाम सुरू होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना, दुसरीकडे पहिल्याच पेटीला मिळालेला २१ हजार रुपयांचा विक्रमी दर सध्या संपूर्ण कोकणात आणि आंबा बाजारपेठेत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. हंगामाच्या तब्बल चार महिने आधी बाजारात आलेल्या या पहिल्या वहिल्या राजापूर/रत्नागिरी हापूस आंब्याचे पहिले मानकरी आणि ग्राहक होण्याचा मान कौस्तुभ दीक्षित यांनी मिळवला आहे.

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: रत्नागिरी हापूस आंब्याचे पहिले मानकरी कोण ठरले?

    Ans: रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी कौसतुभ दीक्षित यांनी खरेदी केली आहे.

  • Que: रत्नागिरी हापूस आंब्याच्या एक डझनची किंमत किती?

    Ans: हापूस आंब्याच्या पेटीला २१ हजार रुपयांचा मोठा दर मिळाला आहे.

Web Title: Kaustubh dixit buy first box of ratnagiri alphonso 21000 breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Mango Rate
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय
1

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.