Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंडनमध्ये ‘या’ भारतीयाने खरेदी केले 1,446 कोटींचे घर; मुकेश अंबानींनाही सोडले मागे!

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनच्या हाइड पार्कजवळील अबरकॉनवे हाऊस 1,446 कोटी रुपयांना विकत घेतले. हे घर 2023 मधील लंडनमधील सर्वात महागडे घर ठरले आहे. हे घर सीरम लाइफ सायन्सेसने विकत घेतले आहे. हे घर पूनावाला कुटुंबाकडून ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान वापरले जाणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 04, 2024 | 06:22 PM
लंडनमध्ये 'या' भारतीयाने खरेदी केले 1,446 कोटींचे घर; मुकेश अंबानींनाही सोडले मागे!

लंडनमध्ये 'या' भारतीयाने खरेदी केले 1,446 कोटींचे घर; मुकेश अंबानींनाही सोडले मागे!

Follow Us
Close
Follow Us:

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनमधील दुसरे सर्वात महागडे घर खरेदी करत इतिहास घडवला आहे. या आलिशान घराचा व्यवहार गेल्या वर्षी झाला होता. त्याची किंमत तब्बल 1,446 कोटी रुपये आहे. हे घर अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची उपकंपनी सीरम लाईफ सायन्सेसने विकत घेतले आहे.

यूकेमध्ये राहण्यासाठी ठरणार उपयोगी

४२ वर्षीय अब्जाधीश अदार पूनावाला यांनी हायड पार्कजवळ असलेले हे एक शतक जुने अबरकॉनवे हाऊस विकत घेतले आहे. हे घर पोलंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिवंगत उद्योगपती जान कुल्झिक यांची मुलगी डोमिनिका कुल्झिक हिचे होते. हे घर कंपनी आणि पूनावाला कुटुंबासाठी यूकेमध्ये राहण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. पूनावाला कुटुंबीयांचा कायमस्वरूपी ब्रिटनमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : हायस्कुलला असतानाच शिक्षण सोडले; तरुणाने 19 व्या वर्षीच उभी केली 136 कोटींची कंपनी!

ठरले दुसरे सर्वात महागडे घर

अबरकॉनवे हाऊस हे घर लंडनमध्ये विकले जाणारे दुसरे सर्वात महागडे घर ठरले आहे. याआधी सर्वात महाग घर म्हणून 2-8A रटलँड गेट ठरले होते. जानेवारी 2020 मध्ये 2-8A रटलँड गेट हे घर तब्बल 19,000 कोटी रुपयांना विकले गेले होते. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे माजी क्राउन प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीझ यांच्या इस्टेटमधून एव्हरग्रेंडचे संस्थापक आणि अध्यक्ष हुई का यान यांनी हे घर विकत घेतले आहे.

कोण आहेत अदार पूनावाला?

अदार पूनावाला हा सायरस पूनावाला यांचा मुलगा आहे. सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती १.८ लाख कोटी रुपये आहे. अदारने स्वतः स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2011 मध्ये अदार पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून कंपनीला नवीन दिशा मिळाली. तर कोरोना महामारीमध्ये लस निर्मिती करत, अदार पूनावाला यांनी जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : 1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; ‘या’ कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!

लंडनमध्ये मुकेश अंबानी यांचे आलिशान हॉटेल

लंडनमध्ये अनेक भारतीय उद्योगपतींची आलिशान घरे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे स्टोक पार्कमध्ये आलिशान हॉटेल आहे. या 49 बेडरूमच्या हॉटेलमध्ये 13 टेनिस कोर्ट, 14 एकर खाजगी गार्डन आणि 27-होल गोल्फ कोर्स आहे. हे हॉटेल मुकेश अंबानी यांनी 2020 मध्ये 529 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याचप्रमाणे लक्ष्मी मित्तल यांचेही लंडनमधील पॉश भागात अनेक बंगले आहेत. बिशप अव्हेन्यू येथे असलेला समर पॅलेस हे त्यांचे आलिशान घर असल्याचे सांगितले जाते.

Web Title: 1446 crore house bought by adar poonawala in london mukesh ambani left behind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 06:22 PM

Topics:  

  • Adar poonawala
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार
2

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?
3

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये
4

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.