Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार

Bank Strike Salary Date : महिन्याच्या शेवटी लागोपाठ ३ दिवस बँकांचा देशव्यापी संप असणार असल्याने नोकरदार वर्गाची पगाराबाबत (Salary) चिंता वाढली आहे. या संपामुळे खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होणार की उशीर होणार, कोणाचा पगार संपापूर्वीच खात्यात जमा होईल आणि कोणाला वाट पाहावी लागणार काय होणार?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 25, 2026 | 04:33 PM
Bank Strike मुळे पगारावर परिणाम? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Bank Strike मुळे पगारावर परिणाम? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अरे देवा… मग Salary चं काय?
  • Bank Strike मुळे पगारावर परिणाम?
  • आता वाट बघावी लागणार
Bank Strike Salary Date : जर तुमचा पगार महिन्याच्या शेवटच्या तारखेंना येत असेल, तर या महिन्यात तुमची काळजी वाढू शकते. २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभरात तीन दिवसांचा बँक संप आहे. त्याआधी, २६ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबर रोजी रविवार आहे. याचा अर्थ, बँकेच्या कामकाजावर सलग पाच दिवस परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमचा पगार अडकण्याची शक्यता आहे? नेमकी काय आहे परिस्थिती? ( Bank Strike Salary Date )

Free LPG Cylinder : एक दोन नाही तर थेट 6 सिलेंडर मिळणार फ्री, कसं काय? जाणून घ्या काय आहे योजना?

२६ सप्टेंबरपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत बँक बंद असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की: सप्टेंबरचा पगार कधी येणार? कोणाचा पगार कधी येईल आणि कोणाचा लवकर येईल? चला, हे तर हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

सर्वात आधी कोणाला पगार मिळेल?

केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बँक संपाचा परिणाम कमी करण्यासाठी, अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर महिन्याचा पगार, वेतन आणि निवृत्तीवेतन २५ सप्टेंबर रोजी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोणाच्या पगाराला विलंब होईल?

जर तुमची कंपनी २८ सप्टेंबरपूर्वी तुमच्या पगारावर प्रक्रिया करत असेल, तर तुम्हाला वेळेवर पगार मिळू शकतो. पण ज्या कंपन्यांमध्ये पगाराची प्रक्रिया २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान होते, त्यांना विलंब होऊ शकतो. याचा अर्थ असा की, खाजगी कर्मचाऱ्यांसाठी या महिन्याची प्रक्रिया त्यांच्या नियोक्ता आणि बँकेच्या प्रक्रियेवर अवलंबून असेल.

संपादरम्यान काय बंद राहील?

जर संप झाला, तर काही बँकिंग व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे आणि काढणे, डिमांड ड्राफ्ट आणि खाते उघडणे यांचा समावेश आहे. तथापि, एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील.

२७ सप्टेंबर रोजी बँका सुरू राहतील का?

बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी, आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार, २७ सप्टेंबर रोजी उघडे राहण्याची परवानगी दिली आहे, जेणेकरून ग्राहक २८ सप्टेंबर रोजी संप सुरू होण्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करू शकतील आणि त्यांचे पगार वेळेवर जमा होऊ शकतील.

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत

Web Title: 3 days bank strike salary impact when will you get monthly pay marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • bank close
  • Employees on Strike
  • Salary Pending

संबंधित बातम्या

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
1

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
2

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.