Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीएसएनएलकडून मिळाली मोठी ऑर्डर, या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडलेत!

शेअर्स 15 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर 7,607.15 रुपयांवर पोहोचला हाेता. हा शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3,812.35 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर होता.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 06, 2024 | 09:11 PM
1 लाखाचे झाले 84 लाख रुपये; चित्रपट क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा!

1 लाखाचे झाले 84 लाख रुपये; चित्रपट क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा!

Follow Us
Close
Follow Us:

कंपन्यांशी संबंधित सकारात्मक बातम्यांमुळे शेअर बाजारातील बहुतांश शेअर्स वधारले. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्येही अशीच वाढ झाली आहे. या कंपनीने भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली आहे. या बातमीनंतर गुंतवणूकदार पॉलीकॅबच्या शेअर्सवर तुटून पडले आहे. पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्सने 5 टक्के वाढ नाेंदवत, मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 6934.15 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला आहे.

हे देखील वाचा – पैसे तयार ठेवा, …येतोय देशातील सर्वात मोठा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार!

वर्षभरात 32 टक्के वाढ

पॉलीकॅब इंडियाचा शेअर्स 15 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर 7,607.15 रुपयांवर पोहोचला हाेता. हा शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3,812.35 रुपयांवर होता. शेअर्सची ही 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी आहे. गेल्या एका वर्षात पॉलीकॅब इंडियाचे शेअर्स जवळपास 32 टक्के वाढले आहेत.
(फोटो सौजन्य – iStock)

हे देखील वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती कितीये? भारतात देखील केलीये गुंतवणूक! वाचा… सविस्तर

काय सांगितलंय कंपनीने

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये पॉलीकॅब इंडियाने म्हटले आहे की, कर्नाटक, गोवा आणि पुद्दुचेरीमध्ये भारत नेटच्या मिडल माईल नेटवर्कचे बांधकाम, अपग्रेडेशन, ऑपरेशन आणि देखभाल यासाठी ती सर्वात कमी बोली लावली आहे. कंपनी डिझाईन बिल्ड ऑपरेट अँड मेंटेन मॉडेलवर प्रकल्प सुरू करणार आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, ऑर्डरचा आकार 4099.69 कोटी रुपये आहे. कंपनी तीन वर्षांत मिडल माईल नेटवर्क तयार करेल.

10 वर्षे देखभाल करणार

दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार, पॉलीकॅब इंडिया प्रकल्पासाठी 10 वर्षांची देखभाल देखील करेल. देखरेखीसाठी पहिल्या पाच वर्षांसाठी भांडवली खर्चाच्या वार्षिक 5.5 टक्के आणि पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक 6.5 टक्के भांडवली खर्च लागेल.

हे देखील वाचा – शेअर्स 32 रुपयांवरून पाेहाेचला 1000 रुपयांवर; 1 लाखाचे झाले 31 लाख, गुंतवणुकीची मोठी संधी!

तिमाही निकालातील कंपनीची कामगिरी

आर्थिक वर्ष 2025 च्या सप्टेंबर तिमाहीत पॉलीकॅब इंडियाचा महसूल गेल्या वर्षीच्या 4,217.7 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 टक्के वाढून, 5,498.4 कोटी रुपये झाला. त्याच वेळी जून तिमाहीतील 4,698 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 17 टक्के वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 429.77 कोटींच्या तुलनेत 3 टक्के पेक्षा जास्त वाढून, 445.21 कोटी रुपये झाला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: A big order received from bsnl investors fell on the shares of polycab india limited company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 09:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.