Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वऱ्हाडींना मागवले स्वीगीकडून जेवण; ‘या’ जोडप्याच्या लग्नातील पाहुणचाराची सर्वदूर चर्चा!

एखाद्या व्यक्तीने थेट स्वीगी या कंपनीलाच आपल्या लग्न समारंभातील जेवणासाठी ऑर्डर दिल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे. मात्र, आता दिल्लीतील एका जोडप्याने आपल्या लग्न समारंभाची ऑर्डर एखादा हलवाई किंवा केटरर्सला देण्याऐवजी स्वीगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीला जेवणाची ऑर्डर दिली. ज्याची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 07, 2024 | 03:32 PM
वऱ्हाडींना मागवले स्वीगीकडून जेवण; 'या' जोडप्याच्या लग्नातील पाहुणचाराची सर्वदूर चर्चा!

वऱ्हाडींना मागवले स्वीगीकडून जेवण; 'या' जोडप्याच्या लग्नातील पाहुणचाराची सर्वदूर चर्चा!

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन फूड डिलीवरी कंपनी म्हणून झोमॅटो आणि स्वीगीने अलीकडे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ग्राहक म्हणून नागरिक देखील घरी जेवण तयार करायचा मूड नसेल तर अगदी सहजपणे झोमॅटो आणि स्वीगीकडे एका दिवसाच्या जेवणसासाठी ऑर्डर जेवण करतात. मात्र, आता एखाद्या व्यक्तीने थेट स्वीगी या कंपनीलाच आपल्या लग्न समारंभातील जेवणासाठी ऑर्डर दिल्याने, त्याची सर्वदूर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिल्लीतील जोडप्याची लग्नाची सर्वदूर चर्चा

तुम्हालाही ऐकून नवल वाटले असेल की एखादी व्यक्ती लग्न समारंभासारख्या एक मोठ्या कार्यक्रमासाठी स्वीगी सारख्या कंपनीकडून जेवण कसे मागवू शकतो? मात्र, हे अगदी खरे असून, राजधानी दिल्ली येथील एका जोडप्याने आपल्या लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या वऱ्हाडींच्या जेवणाच्या व्यवस्था स्वीगी या ऑनलाईन फूड डिलीवरी कंपनीकडून केली आहे.

हेही वाचा : इंडिगोच्या फ्लाइट तिकिटांवर 18 टक्के सूट; … ‘बिझनेस क्लास’ सीटची सुविधाही सुरू होणार!

‘एक्स’ युजरकडून माहिती शेअर

सर्वसाधारणपणे लोक लग्न किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी हलवाई किंवा केटरर्सला संपूर्ण जेवणाची ऑर्डर देतात. मात्र, दिल्लीतील एका जोडप्याने आपल्या लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी स्वीगीकडून जेवण ऑर्डर केले. मग काय लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला. दिल्लीतील या लग्नातील अनोख्या पाहुणचाराबाबत सुश्मिता नावाच्या एका ‘एक्स’ युजरने फोटो शेअर करत माहिती दिली आहे. ज्यामुळे सध्या या लग्न समारंभाची सर्वदूर चर्चा होत आहे.

 

They ordered food online for an engagement ceremony?? Bhai I have seen everything 😭😭 pic.twitter.com/v4szxFg4pM

— Susmita (@shhuushhh_) August 4, 2024

अनेक युजर्सकडून रिअ‍ॅक्शन

उपलब्ध माहितीच्या आधारे दिल्लीतील एका जोडप्याने आपल्या लग्न समारंभाची ऑर्डर एखादा हलवाई किंवा केटरर्सला देण्याऐवजी स्वीगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीला जेवणाची ऑर्डर देणे उचित समजले. विशेष म्हणजे ही संकल्पना पाहुण्यांच्या देखील चांगलीच पसंती उतरली. मात्र, आता समाजमाध्यमांवर याबाबत माहिती प्रसारित झाल्यानंतर अनेक युजर त्यावर रिअ‍ॅक्शन देत आहे.

हेही वाचा : …तब्बल 50 हजार कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची पगारी सुट्टी; ‘या’ नामांकित कंपनीच्या निर्णयाची सर्वदूर चर्चा!

कंपनीने मारला ‘मौके पे चौका’

विशेष म्हणजे सुश्मिता नावाच्या ‘एक्स’ युजरची पोस्ट पाहिल्यानंतर स्वीगीने देखील आपल्या अधिकृत हॅन्डलवरून संबंधित लग्न संभारभातील ऑर्डरचा फोटो शेअर केला आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या आजपर्यंतच्या क्रेझी डील्सचा वापर या जोडप्याशिवाय अन्य कोणी केला नसेल. या जोडप्याने कंपनीला लग्न समारंभाच्या जेवणाची ऑर्डर कंपनीला दिली. तसेच कंपनी मोठ्या ऑर्डर घेण्यासाठी देखील सक्षम असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: A delhi couple ordered food from swiggy in their wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • Delhi news

संबंधित बातम्या

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;
1

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?
2

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?

Gordon Ramsay India Debut : प्रसिद्ध मिशेलिन-स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांनी भारतात उघडले पहिले रेस्टॉरंट; एकदा पहाच झलक
3

Gordon Ramsay India Debut : प्रसिद्ध मिशेलिन-स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांनी भारतात उघडले पहिले रेस्टॉरंट; एकदा पहाच झलक

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश
4

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.