Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Minister India Visit : पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर; ताजमहल पाहण्याची दिली परवानगी पण…

SCO सभ्यता संवाद परिषदेसाठी भारतात आलेल्या मलिक यांना ताजमहालसह चार ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्यास सुरक्षेच्या कारणामुळे परवानगी नाकारण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 21, 2026 | 02:11 PM
pakistan-minister-musadik-malik-india-visit-taj-mahal-sco

pakistan-minister-musadik-malik-india-visit-taj-mahal-sco

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचे मंत्री भारताच्या दौऱ्यावर 
  • जलवायू परिवर्तन मंत्री मुसादिक मसूद मलिक ताजमहाल पाहणार
  • ‘हे’ ठिकाण पाहण्याची परवानगी नाही 
Pakistan Minister Musadik Masood Malik visits India : पाकिस्तानचे जलवायू परिवर्तन मंत्री मुसादिक मसूद मलिक हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO)सभ्यता संवाद परिषदेसाठी ते आले असून त्यांचा हा दौरा प्रचंड चर्चेत आहे. मे २०२५ मधील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर भारतात भेट देणारे ते पहिले पाकिस्तानी केंद्रीय मंत्री ठरले आहेत. मुसादिक मसूद मलिक यांना जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक असलेले ताजमहल पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही अटीही लावण्यात आले आहेत.

मुसादिक मसूद मलिक हे लवकरच ताजमहल पाहण्यासाठी जाणार आहे. स्थापत्य कलेचे उत्तम नमुना असलेले आणि जगातील आश्चर्यांपैकी एक असलेली ही वास्तू पाहण्यासाठी ते जाणार आहेत. याचबरोबर त्यांनी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दरग्यात जाण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. पण सुरक्षेच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात आली. ते आता ताजमहलसोबत इतर चार ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहे.

‘ही’ पाच ठिकाणं पाहण्याची मागितलेली परवानगी

मुसादिक मसूद मलिक यांनी सहयोग परिषदेत सहभागी होण्यापूर्वी भारत सरकारकडून पाच ठिकाणांना भेट देण्याची परवानगी विचारली होती. यामध्ये ताजमहल, दिल्ली घाट, हुमायूंचा मकबा, किल्ला राय पिथौरा आणि जरत निजामुद्दीन दर्गा यांचा समावेश होता. यातील दर्गा सोडून इतर ठिकाणी भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुसादिक मसूद मलिक यांची ताजमहल भेट लक्षवेधी ठरणार आहे.

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील

मुसादिक मसूद मलिक यांच्या भारत दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० नोव्हेंबर रोजी ते नवी दिल्लीत दाखल झाले. येथील पुराना किल्ला येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या SCO सभ्यता संवाद परिषदेत ते पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.दोन्ही देशांमधील संघर्ष कमी होऊन संबंध सुधारतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

विमानतळावर पाकिस्तानच्या उच्चायोगातील प्रभारी अधिकारी साद वारैच यांनी त्यांचे स्वागत केले. मे २०२३ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी गोव्यातील SCO बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा भारतातील हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या भेटीला राजनैतिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माध्यमांशी संवाद साधताना मुसादिक मलिक यांना भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सकारात्मक उत्तर दिले.ते म्हणाले, “मला वाटते की आपले सर्व संबंध सुधारतील. सध्या संपूर्ण प्रदेशात वेगाने बदल होत आहेत. जागतिक राजकारणाची समीकरणेही झपाट्याने बदलत आहेत.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुसादिक मसूद मलिक भारतात का आले आहेत?

    Ans: ते नवी दिल्लीतील SCO सभ्यता संवाद परिषदेत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारतात आले आहेत.

  • Que: मुसादिक मसूद मलिक यांना कोणत्या ठिकाणांना भेट देण्याची परवानगी मिळाली आहे?

    Ans: ताजमहाल, दिल्ली घाट, हुमायूंचा मकबरा आणि किल्ला राय पिथौरा या चार ठिकाणांना भेट देण्याची परवानगी मिळाल्याचे बातमीत नमूद आहे.

  • Que: हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्यास परवानगी का नाकारण्यात आली?

    Ans: सुरक्षेच्या कारणामुळे मुसादिक मसूद मलिक यांना हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची परवानगी देण्यात आली नाही.

Web Title: Pakistan minister musadik malik india visit taj mahal sco not to hazrat nizamuddin dargah nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Delhi news
  • India pakistan Dispute
  • Taj Mahal

संबंधित बातम्या

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील
1

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील

दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज
2

दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.