Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज

नव्या संशोधनामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाला वैज्ञानिक माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होत आहे. आयआयटीएममधील शास्त्रज्ञ सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही प्रणाली हवेच्या गुणवत्तेचा काही दिवस आधी अंदाज देते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2026 | 11:01 AM
दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज

दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील वायुप्रदूषणाचा अचूक अंदाज घेण्यासाठी ‘एअरवाइज’ प्रणाली विकसित.
  • अमेरिकन मेटेरिऑलॉजिकल सोसायटीने (AMS) या प्रणालीची दखल घेतली.
  • पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) यांनी प्रणाली विकसित केली.
पुणे : दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाचा अचूक अंदाज घेऊन त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मदत करणाऱ्या ‘एअरवाइज’ या अत्याधुनिक प्रणालीची अमेरिकन मेटेरिऑलॉजिकल सोसायटीने (एएमएस) दखल घेतली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेल्या या प्रणालीमुळे दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा सुक्ष्म स्तरावर अंदाज घेण्यासह प्रदूषणाचे स्रोत निश्चित करणे शक्य झाले आहे.

नव्या संशोधनामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाला वैज्ञानिक माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होत आहे. आयआयटीएममधील शास्त्रज्ञ सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही प्रणाली हवेच्या गुणवत्तेचा काही दिवस आधी अंदाज देते. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचे ४०० मीटरच्या सूक्ष्म स्तरावर पूर्वानुमान करण्याची या प्रणालीची क्षमता आहे. यासाठी उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती आणि देशभरातील सुमारे ३७० हवेच्या गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवरील नोंदींचा वापर केला जातो. दिल्लीतील हिवाळी प्रदूषणामागे हवामानशास्त्रीय घटकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे घुडे यांनी स्पष्ट केले आहे.

जीआरएपीच्या अंमलबजावणीतही उपयोग

हिवाळ्यात तापमानाचे व्युत्क्रमण (व्यस्त वितरण), मंद वारे आणि जमिनीलगतच्या हवेच्या थराची कमी उंची यामुळे प्रदूषके वातावरणात अडकून राहतात. त्यातच पंजाब आणि हरियाणातील शेतातील अवशेष जाळणे, वाहनांची वर्दळ, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामे आणि कचरा जाळणे यांमुळे प्रदूषणाची तीव्रता वाढते.

एअरवाइजमधील निर्णय सहाय्य प्रणालीमुळे…

एअरवाइजमधील निर्णय सहाय्य प्रणालीमुळे प्रदूषणाचे प्रमुख स्रोत ओळखण्याबरोबरच उत्सर्जन कमी करण्याच्या विविध उपाययोजनांचा परिणामही तपासता येतो. त्यामुळे प्रदूषणाची स्थिती गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाला निर्बंध लागू करणे, बांधकामांवर नियंत्रण ठेवणे तसेच वाहतूक आणि औद्योगिक उत्सर्जन कमी करण्यासारखे निर्णय घेणे शक्य होते.

पाच शहरांत प्रणालीचा विस्तार करण्याचे नियोजन

दिल्लीतील अनुभवाच्या आधारे मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, पुणे आणि जयपूर या शहरांमध्येही एअरवाइज प्रणालीचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शहरातील प्रदूषणाचे स्रोत आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार प्रणाली विकसित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्राधारित शिक्षणाच्या साहाय्याने उत्सर्जनाच्या नोंदी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यावरही भर दिला जात आहे.

FAQ

1. ‘एअरवाइज’ प्रणाली काय आहे?
दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा काही दिवस आधी अंदाज घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास मदत करणारी अत्याधुनिक प्रणाली आहे.

2. ‘एअरवाइज’ प्रणाली कोणी विकसित केली?
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) ही प्रणाली विकसित केली आहे.

3. ‘एअरवाइज’ प्रणालीचे नेतृत्व कोणी केले?
आयआयटीएममधील शास्त्रज्ञ सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली.

Web Title: Scientific look at delhi pollution from pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Delhi Air Pollution
  • Delhi news

संबंधित बातम्या

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न
1

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.