
आधार हाऊसिंग फायनान्सच्या नफ्यात २७ टक्क्यांची भरघोस वाढ; ३११ कोटींचा टप्पा पार (Photo Credit- X)
31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे नेटवर्थ वाढून 7 हजार 541 कोटी रुपयांवर गेले आहे. आधार हाउसिंगच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेचे (एयुएम) मूल्य 20 टक्क्याने वाढले आहे. एयूएमचे प्रमाण 25 हजार 531 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 हजार 571 कोटी रुपये इतके झाले आहे. सरत्या तिमाहीत कंपनीने 3 हजार 87 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले. तर कर्ज खात्यांची एकूण संख्या 3 लाख 36 हजारांवर गेली आहे.
मालमत्तेवरील परतावा अर्थात आरओएचे प्रमाण 4.4 टक्क्यांच्या आसपास तसेच समभागावरील परताव्याचे प्रमाण 15.9 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. कंपनीची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (ग्रॉस एनपीए) 1.08 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. सातत्यपूर्ण विकास आणि मालमत्तेच्या दर्जातील स्थिरता ही निकालाची वैशिष्ट्ये आहेत. तिमाहीत कंपनीने आतापर्यंतचे सर्वात जास्त कर्ज वितरण केले आहे. नफ्यातील वाढ देखील समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी दिली.