Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhar Housing Finance : घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा 308 कोटींवर; क्रेडिट रेटिंगमध्येही सुधारणा

Aadhar Housing Finance : गृहवित्त क्षेत्रातील आघाडीची कंपनी आधार हाऊसिंग फायनान्सने सप्टेंबर तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी करत कर्ज वितरणात २२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ३०८ कोटी रुपयांवर पोहोचला असून व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ३२,६४३ कोटी रुपयांवर गेली आहे, तर एनपीएच्या प्रमाणातही सुधारणा झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 07, 2026 | 07:31 PM
आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा 308 कोटींवर ( सौजन्य - सोशल मीडिया )

आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा 308 कोटींवर ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • गृहवित्त क्षेत्रातील दिग्गज कंपनीची कमाल!
  • सप्टेंबर तिमाहीत जबरदस्त कमाई
  • जाणून घ्या आधार हाऊसिंग फायनान्सचे ताजे आकडे
Aadhar Housing Finance : मुंबई — गृहवित्त क्षेत्रातील कंपनी आधार हाऊसिंग फायनान्सच्या सप्टेंबर तिमाहीतील कर्ज वितरणात 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने तिमाही आणि सहामाहीतील आर्थिक कामगिरीचे आकडे जाहीर केले आहेत. गृहवित्त क्षेत्रातील आघाडीची कंपनी आधार हाऊसिंग फायनान्सने सप्टेंबर तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी करत कर्ज वितरणात २२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ३०८ कोटी रुपयांवर पोहोचला असून व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ३२,६४३ कोटी रुपयांवर गेली आहे, तर एनपीएच्या प्रमाणातही सुधारणा झाली आहे. ( Aadhar Housing Finance ) 

Share Market : पुन्हा बहरला… भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची तुफान फटकेबाजी! 3 दिवसांत तब्बल 29096 कोटींची गुंतवणूक

कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता 18 % वाढली

गतवर्षीच्या सहामाहीतील 27 हजार 554 कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयुएम) 18 टक्क्यांनी वाढून 32 हजार 643 कोटी रुपयांवर गेली आहे. याच कालावधीत कर्ज वितरणाचे प्रमाण 4 हजार 89 कोटी रुपयांच्या तुलनेत 4 हजार 613 कोटी रुपयांवर गेले आहे.

सहामाहीत 591 कोटी रुपयांचा नफा

कंपनीला सप्टेंबर तिमाहीत 308 कोटी रुपयांचा तर सहामाहीत 591 कोटी रुपयांचा नफा झाला. नफ्यातील ही वाढ क्रमश: 16 आणि 17 टक्के इतकी आहे. सहामाहीत नक्त मालमत्ता वाढून 6894 कोटी रुपयांच्या तुलनेत 8201 कोटी रुपयांवर गेली आहे. मालमत्तेवरील परतावा 4.2 टक्क्यांवर स्थिर राहिला असून भाग भांडवलावरील परतावा 15 टक्के इतका असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीची समाधानकारक कामगिरी

ढोबळ अनुत्पादक मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण 1.42 टक्क्यांच्या तुलनेत घटून 1.34 टक्के इतके झाले आहे. कंपनीची समाधानकारक कामगिरी पाहून इंडिया रेटिंग आणि इक्रा या पतमापन संस्थांनी दीर्घकाळचे क्रेडिट रेटिंग वाढवत एए प्लस (स्थिर) असे केले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने जम्मू येथील शाखेची सुरुवात केली. या विस्तारानंतर 23 राज्यांतील शाखांची संख्या 632 वर पोहोचली आहे. आधार हाऊसिंग ही द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांसह निमशहरी भागात गृहवित्त पुरवठा करणारी आघाडीची कंपनी आहे.

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

💡

Frequently Asked Questions

  • Que: आधार हाऊसिंग फायनान्सच्या सप्टेंबर तिमाहीच्या कर्ज वितरणात किती वाढ झाली आहे?

    Ans: कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीतील कर्ज वितरणात २२ टक्क्यांची वाढ झाली असून, व्यवस्थापनाखालील मालमत्ता १८ टक्क्यांनी वाढून ३२,६४३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

  • Que: सप्टेंबर तिमाहीत कंपनीला किती नफा झाला आहे?

    Ans: कंपनीला सप्टेंबर तिमाहीत ३०८ कोटी रुपयांचा (१६% वाढ) तर सहामाहीत ५९१ कोटी रुपयांचा (१७% वाढ) नफा झाला आहे.

  • Que: कंपनीच्या क्रेडिट रेटिंगमध्ये आणि शाखा विस्तारात काय बदल झाला आहे?

    Ans: कंपनीची उत्तम कामगिरी पाहून इंडिया रेटिंग आणि इक्रा या संस्थांनी दीर्घकाळचे क्रेडिट रेटिंग वाढवून 'एए प्लस (स्थिर)' केले आहे, तसेच जम्मू शाखेच्या शुभारंभासह कंपनीच्या एकूण शाखांची संख्या ६३२ वर पोहोचली आहे.

Web Title: Aadhar housing finance q2 loan disbursement up 22 percent marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • finance
  • Housing

संबंधित बातम्या

Farmer Harassment : “भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?” फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!
1

Farmer Harassment : “भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?” फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.