Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Harassment : “भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?” फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

Farmer Harassment : दुष्काळाच्या झळा अन् वरून फायनान्स कंपनीचा भयंकर टॉर्चर! "भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज कशाला घेतलं?" बुलढाण्यात एयु फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 04, 2026 | 04:41 PM
Farmer Harassment : "भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?" फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

Farmer Harassment : "भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?" फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात एयु फायनान्सकडून शेतकऱ्याला अमानुष शिवीगाळ
  • “भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज कशाला घेतलं?” ऑडिओ व्हायरल
  • सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक
Farmer Harassment: दुष्काळ आणि रोजगाराच्या गंभीर समस्येने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर फायनान्स कंपन्यांकडून मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात कर्जवसुलीच्या नावाखाली एका शेतकऱ्याला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मानसिक त्रास दिल्याची आणि अपमानित केल्याची घटना उघडकीस आली आहे. एयु फायनान्स बँकेच्या (AU Finance Bank) वसुली कर्मचाऱ्याने केलेल्या या मुजोरीमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा: Nalasopara News: कुत्र्याला मारल्याच्या वादाचा भयानक बदला! ४०-५० जणांचा टोळका थेट घरात घुसला अन्…

ऑडिओ क्लिपमुळे मुजोरी उघड

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीने बचत गटामार्फत कर्ज घेतले होते. या कर्जाचा हप्ता थकल्याने एयु फायनान्सच्या कर्मचाऱ्याने थेट शेतकऱ्याला फोन करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज घेतलं कशाला?” अशा अतिशय भयंकर आणि शिवराळ शब्दांचा वापर करत कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या शेतकऱ्याने हा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला असून, ही धक्कादायक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…

शासकीय आदेश धाब्यावर; शेतकरी संघटना आक्रमक

एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून सक्तीची कर्जवसुली न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरीदेखील खासगी फायनान्स कंपन्या आणि बँका शासकीय नियमांची पायमल्ली करत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. वसुली कर्मचाऱ्यांच्या अशा त्रासामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. “महाराष्ट्रात चाललंय तरी काय?” असा थेट सवाल उपस्थित करत दोषी कर्मचाऱ्यावर आणि संबंधित बँकेवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाण्यात कोणत्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचा छळ केला?

    Ans: एयु फायनान्स बँकेच्या (AU Finance Bank) कर्जवसुली कर्मचाऱ्याने फोनवर शेतकऱ्याचा अपमान आणि शिवीगाळ केली.

  • Que: ही घटना कशामुळे घडली आणि काय पुरावा समोर आला आहे?

    Ans: बचत गटामार्फत घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्याने फोन केला होता. या संभाषणाची शिवीगाळ असलेली ऑडिओ क्लिप शेतकऱ्याने रेकॉर्ड केली असून ती व्हायरल झाली आहे.

  • Que: या घटनेवर स्थानिक व शेतकरी संघटनांची काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: सरकारी आदेश असतानाही सक्तीची वसुली करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप करत संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Buldhana au finance recovery agent abuses farmer audio viral sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Buldhan News
  • farmer
  • finance
  • Harassment
  • Loan

संबंधित बातम्या

John Deere India Sells : शेतकरी राजाची पहिली पसंती! जॉन डियरने रचला इतिहास; एका वर्षात 1 लाख ट्रॅक्टरची विक्री
1

John Deere India Sells : शेतकरी राजाची पहिली पसंती! जॉन डियरने रचला इतिहास; एका वर्षात 1 लाख ट्रॅक्टरची विक्री

Amravati News: विमा रखडला, यंदाही संकट! निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, पावसाची दडी; शेतकरी दुहेरी संकटात
2

Amravati News: विमा रखडला, यंदाही संकट! निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, पावसाची दडी; शेतकरी दुहेरी संकटात

Farmers Demand Water Loan : चक्क पाण्यासाठी हवंय कर्ज! शेतकऱ्यांची अनोखी आणि आक्रमक मागणी; पिकं वाचवण्यासाठी आंदोलन
3

Farmers Demand Water Loan : चक्क पाण्यासाठी हवंय कर्ज! शेतकऱ्यांची अनोखी आणि आक्रमक मागणी; पिकं वाचवण्यासाठी आंदोलन

PM Modi News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदींचा निर्धार! विज्ञान-तंत्रज्ञानासह शेतीच्या सर्वांगीण विकासावर भर
4

PM Modi News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदींचा निर्धार! विज्ञान-तंत्रज्ञानासह शेतीच्या सर्वांगीण विकासावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.