महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान; म्हणाले...
फॉरेक्स ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून कारवाई करण्यात आली आहे . मंगळवारी दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी आरबीआयने आपली अलर्ट यादी अपडेट केली, ज्यामध्ये या अनधिकृत प्लॅटफॉर्मची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. आरबीआयने या प्लॅटफॉर्मवर विदेशी चलन व्यवहाराच्या विदेशी चलन व्यापार आणि इलेक्ट्रॉनिक व्यापारात भाग घेण्यावर बंदी घातली आहे.
आरबीआयकडून कारवाई करण्यात आलेले 13 प्लॅटफॉर्म
RBI च्या नवीन अलर्ट लिस्टमध्ये TDFX, Inefex, YorkerFX, Growline, Ranger Capital, Smart Prop Trader,Think Markets, Funded Next, Welltrade, FreshForex, FX Road, DBG Markets आणि PlusOne Trade या नावांचा समावेश आहे. या सर्व युनिट्सवर फॉरेक्स ट्रेडिंगसाठी अधिकृत नसल्याचा आरोप आहे.
कारवाईच्या यादीत एकूण 88 युनिट्स
आरबीआयने यासंबंधी असेही स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या संस्थेचे नाव या यादीत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की ती विदेशी मुद्रा व्यापारासाठी अधिकृत संस्था आहे. आरबीआयने म्हटले आहे की ही देण्यात आलेली यादी पूर्ण नाही. सर्व गुंतवणूकदारांनी व्यापार सुरू करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मच्या कायदेशीरतेबद्दल संपूर्ण माहिती मिळवावी ही सूचनाही मध्यवर्ती बॅंकेकडून करण्यात आली आहे.
कठोर भूमका घेण्याच्या बॅंकाना सूचना
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही या वर्षी एप्रिलमध्ये, अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर चिंता व्यक्त केली होती. यासोबतच त्यांनी अशा बेकायदेशीर कारवायांविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या. यापूर्वी 2022 मध्ये देखील, RBI ने अनधिकृत प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीविरूद्ध चेतावणी जारी केली होती. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि भारतीय गुंतवणूकदारांना धोका निर्माण करणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मवर आळा घालण्यासाठी आरबीआयचे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशाने पहिल्यांदाच ओलांडला 700 अब्ज डॉलर्स परकीय चलनाचा टप्पा
देशासाठी महत्वाची बाब म्हणजे भारतामधील परकीय चलनाच्याबाबतीत या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी 700 अब्ज डॉलर्सचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला आहे. त्यामुळे सलग सात आठवडे वाढ होत आहे. भारत ही 700 अब्ज परकीय चलनाचा साठा ओलांडणारी चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे.