मोबिक्विक (वन मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेड), कंपनीने आपल्या मोबाईल ॲपवर इंस्टंट फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सेवा सरु केली आहे. कंपनीने ही सेवा स्मॉल फायनान्स बँक (एसएफबी) सोबत भागीदारीत सुरु केली आहे. मोबिक्विक ही भारतात डिजिटल वित्तीय सेवा मंचावर सेवा देणारी एक बलाढ्य कंपनी आहे. ग्राहकांना बचत करणे अत्यंत सोपे जावे या उद्देशाने कंपनीने ही सेवा सुरु केली आहे.
मोबिक्विकच्या या फिक्स्ड डिपॉझिट अर्थात मुदत ठेव योजनेत ग्राहक अगदी छोट्या म्हणजे रु. 1000/- रकेमेपासून बचत करुन त्यावर वार्षिक 9.5 % व्याज कमाउ शकणार असून त्यासाठी त्यांना बँकेत नवे खाते उघडण्याचीही गरज नाही. तसेच ग्राहक आपल्या मुदत ठेवीसाठी त्यांच्या सोईनुसार अत्यल्प म्हणजे अगदी 7 दिवस ते 60 महिन्यांपर्यंत मुदतीची निवड करु शकणार आहेत. तसेच अडीअडचण भासल्यास मुदत पूर्ण होण्याआधी रक्कम काढून घेण्याची सुविधा देखील या योजनेत देण्यात आली आहे. मात्र अशा वेळी व्याजदर वेगळे असतील व ते अटी व शर्थीमध्ये नमूद करण्यात येतील.
बचत ठेवींना उच्च पातळीची सुरक्षितता
मोबिक्विक आपल्या ॲपद्वारे करण्यात आलेल्या बचत ठेवींना उच्च पातळीची सुरक्षितता देणार आहे. त्यासाठी कंपनीने भारतीय रिझर्व बँकेच्या नियमनाखाली असलेल्या एसएफबी व एनबीएफसी उदाहरणार्थ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, बजाज फायनान्स सारख्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान सेवा पुरवठादार ब्लोस्टेम सोबत देखील कंपनीने भागीदारी केली आहे. त्यांच्या सहय्याने मोबिक्विक आपल्या ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणार आहे. ठेवीदारांना एसएमएस/इमेल च्या माध्यमातून ठेव प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूचना व पोचपावती देखील पाठवण्यात येणार आहे.
मोबिक्विक फिक्स्ड डिपॉझिट करण्यासाठी काय करावे?
1. मुदत ठेवीची रक्कम आणि मुदत यांची निवड करा.
2. ॲपच्या माध्यमातून सुरक्षित पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
3. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चार कार्यालयीन दिवस लागू शकतील. मात्र तुम्ही पैसे भरलेल्या तारखेपासून व्याज सुरु होईल.
झटपट केवायसी/व्हिडिओ केवायसी (ग्राहकाची ओळख पटवणे) ही प्रक्रिया पूर्ण होताच मुदत ठेव कार्यान्वित होईल.
नव भारताला पेमेंट व वित्तीय उत्पादने सुरु करण्याची मोहीम हाती घेतलेली मोबिक्विक कंपनी तंत्रज्ञान व नाविन्यकरणार लक्ष केंद्रीत करीत आहे. जेणे करुन ग्राहकांना अत्यंत सोपी व सुलभ सेवा पुरवता येईल. फिक्सड डिपॉसिट योजना सुरु करुन कंपनी सर्व प्रकारची वित्तीय उत्पादने एकाच मंचावर उलब्ध करणारी संस्था म्हणून नाव कमाउ इच्छित आहे. जेणे करुन ग्राहकांचा सर्व प्रकारच्या गरजा कंपनी पूर्ण करु शकेल. परिणामी कंपनीकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होउ लागतील व कंपनी त्यांना सर्व प्रकारच्या वित्तीय सेवेतील संधी उपलब्ध करु शकेल.