Adani Group ची मोठी घोषणा, या राज्यातद करणार 2.3 लाख कोटींची गुंतवणूक
ओडिशाच्या विकासाला गती देण्यासाठी अदाणी समूहाने ही खास योजना तयार केली आहे. अदाणी समूह पुढील पाच वर्षांत ओडिशा राज्यात 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. वीज, सिमेंट, इंडस्ट्रियल पार्क, ॲल्युमिनियम आणि सिटी गॅस यांसारख्या क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
अदाणी पोर्ट्स आणि एसईझेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची भेट घेतली. त्या भेटीत पुढील पाच वर्षांतील ओडिशामधील गुंतवणूकीसाठी सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (28 जानेवारी) ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ‘उत्कर्ष ओडिशा-मेक इन ओडिशा कॉन्क्लेव 2025’ या कार्यक्रमाचं मंगळवारी उद्घाटन केलं. ‘उत्कर्ष ओडिशा 2025’ अंतर्गत कोणत्याही समूहाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, असं अदाणी समूहानं स्पष्ट केले.
या विशेष प्रसंगी, धामरा हवाई पट्टीवर पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या उतरले. ओडिशासाठी नवीन संधीची दारं उघडण्यासाठी या विमानतळाचा भविष्यात उपयोग होणार आहे.
उत्कर्ष ओडिशाच्या निमित्ताने अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने ओडिशात सहा प्रकल्प लाँच केले. यामध्ये भुवनेश्वर विमानतळावरील ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सिटी गेट स्टेशन कम मदर स्टेशन प्रकल्पाचा समावेश आहे.
इतर प्रकल्पांमध्ये भद्रक येथे एलएनजी आणि बहु-इंधन हबची पायाभरणी, बालासोर येथील सीएनजी स्टेशन, भद्रक येथे घरगुती पाईपयुक्त स्वयंपाक गॅसचा शुभारंभ आणि मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथे पहिला सीएनजी स्टेशन प्रकल्प यांचा समावेश आहे. हे प्रकल्प लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होतील, असे समूहाने स्पष्ट केले.
चायनीज AI चॅटबॉट डीपसीकने अमेरिकेतच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवली आहे. डीपसीक लॉन्च होताच अमेरिकेतील टेक्नॉलॉजी कंपनीत अक्षरश: पळापळ सुरु झाली असून शेअर्स कोसळले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आजवर मक्तेदारी असलेल्या अमेरिकन कंपन्यांना चीनच्या डीपसीकने धक्का दिला आहे. नेस्डेक या कंपनीच्या 600 अब्ज डॉलरचा काही मिनिटामध्ये चुराडा झाला. दरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रात ही अभूतपूर्व क्रांती करणाऱ्या तरुणाचं नाव आहे लियांग वेनफेंग.
चीनमधील झोजियांग विद्यापीठातून 2007 साली त्यांनी IT इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर 2010 साली त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रिसर्च मॅनेजमेंटच्या दरम्यान टार्गेट ट्रॅकिंग अल्गोरिदम शोधले. त्याचा कमी खर्चातील PTZ कॅमेऱ्यात वापर केला जातो.
पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर AI शी संबंधित अनेक कंपन्यांची स्थापना केली. 2013 साली हांग्जो याकेबी इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना. 2015 साली झोजियांग जियुझांग अॅसेट मॅनेजमेंटची स्थापना. 2019 मध्ये हाय-फ्लायर AI लॉन्च. 2023 साली डीपसीक कंपनीची स्थापना केली. ही कंपनी AGI डेव्हलप करण्याचं काम करते.