मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बड्या बँकर्सच्या भेटी घेतल्यानंतर गुंतवणुकीसाठी अर्थपुरवठा करण्याचे या सर्वांना आवाहन केले. यावेळी कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक (Uday Kotak), एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, एसआयडीबीआयचे शिवसुब्रह्मण्यम रमणसारख्या या बँकर्सचा समावेश आहे.
मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली. अंबानी यांच्या भेटीअगोदर योगी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचीही भेट घेतली. तसेच, विविध बँकांच्या अधिकारी उद्योगपती यांचीही भेट घेत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी बड्या उद्योगपतींशी देखील चर्चा झाली आहे. यामध्ये आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी आणि जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी सज्जन जिंदाल, यांच्यासह पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी चर्चा केली. योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यात मोठे डेटा सेंटर उभारणीचे काम करणाऱ्या हिरानंदानींनी देखील योगींची पाठ थोपाटली.
Uttar Pradesh CM Yogi Adityanath met Reliance Industries Chairman & Managing Director Mukesh Ambani at Hotel Taj in Mumbai. pic.twitter.com/DW8IwoJ1P2
— ANI (@ANI) January 5, 2023
उत्तर प्रदेशात होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपतींना निमंत्रण दिले आहे. ते यासाठीच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या समिटकरीता १७ लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशात आणण्याचा योगींचा विचार आहे. यातील १० लाख कोटींचे उद्दिष्ट आत्ताच पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईत बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीदरम्यान, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या विकासात भागीदार होण्याचे आणि नवीन भारताचे ‘ग्रोथ इंजिन’ बनण्याच्या प्रवासात तसेच एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.