Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Industries-Jio चा एआय मिशन; १० गिगावॅट ग्रीन एनर्जीवर एआय डेटा सेंटर उभारणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये घोषणा केली की त्यांची कंपनी पुढील सात वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. याबद्दल सविस्तर वाचा.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 20, 2026 | 11:09 AM
Reliance Industries-Jioचा एआय मिशन; १० गिगावॅट ग्रीन एनर्जीवर एआय डेटा सेंटर उभारणार

Reliance Industries-Jioचा एआय मिशन; १० गिगावॅट ग्रीन एनर्जीवर एआय डेटा सेंटर उभारणार

Follow Us
Close
Follow Us:
  • उद्योगपती मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा 
  • ७ वर्षांत करणार १० लाख कोटींची गुंतवणूक
  • एआय तंत्रज्ञानात भारत देश स्वावलंबी होणार
 

Reliance Industries-Jio Mission: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये घोषणा केली की त्यांची कंपनी पुढील सात वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे जिओने मोबाइल डेटा परवडणारा आणि सुलभ बनवला आहे, त्याचप्रमाणे सामान्य भारतीयांसाठी एआय देखील परवडणारा बनवला जाईल.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की जिओने भारताला इंटरनेट युगाची ओळख करून दिली आणि आता देशाला विकसित करण्यासाठी वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती आणेल. त्यांनी यावर भर दिला की भारताने एआय सारख्या तंत्रज्ञानासाठी परकीय अवलंबित्व अर्थात दुसऱ्या देशांचा सहारा घेण्याचा धोका पत्करू नये.

हे देखील वाचा: Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात… गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

जिओ आणि रिलायन्स संयुक्तपणे तीन प्रमुख स्तंभांवर ही गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. यामध्ये गिगावॅट-स्केल एआय डेटा सेंटर हे महत्वाचे म्हणजेच १० गिगावॅट पर्यंतच्या ग्रीन एनर्जीचा वापर करून जामनगरमध्ये एआय-रेडी डेटा सेंटर स्थापित केले जातील, असे सांगितले. राष्ट्रव्यापी एज-कॉम्प्यूट लेयर म्हणजे देशभरात कमी-विलंब एआय सेवा प्रदान करण्यासाठी एज-कॉम्प्यूट पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील, जिओच्या टेलिकम्युनिकेशन नेटवर्कसह एकत्रित केल्या जातील. सार्वभौम संगणकीय पायाभूत सुविधा देखील महत्वाच्या आहेत.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी, चांदीच्या किंमतीही वधारल्या! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

भारतासाठी एक स्वदेशी आणि सुरक्षित एआय संगणकीय परिसंस्था विकसित केली जाईल, ज्यामुळे एआय सेवा किराणा दुकाने, दवाखाने, शाळा आणि शेतांपर्यंत पोहोचू शकतील. मुकेश अंबानी यांनी हे “राष्ट्र उभारणीत संयमी आणि शिस्तबद्ध भांडवली गुंतवणूक” असे वर्णन केले, केवळ व्यावसायिक फायद्यासाठी केलेले पाऊल नाही. त्यांनी सांगितले की जिओ भारतातील एआय परिवर्तनात मध्यवर्ती भूमिका बजावेल, प्रत्येक नागरिक, प्रत्येक क्षेत्र आणि सरकारी सेवांना बुद्धिमत्तेशी जोडेल. ही गुंतवणूक भारताला एआयमध्ये स्वावलंबी बनवण्याच्या आणि डिजिटल क्रांतीच्या पुढील टप्प्यात नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते.

Web Title: Reliance industries jio cha ai mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • jio
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर
1

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.