Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

क्लाउड सॉफ्टेकने कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर एआय-आधारित 'ब्लूहेल्थ' आरोग्य तपासणीची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या हृदयगती, रक्तदाब आणि तणावाची आता झटपट तपासणी होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 08:11 PM
कोकण रेल्वेवर 'एआय'चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी (Photo Credit- X)

कोकण रेल्वेवर 'एआय'चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन आणि BCSSL कडून ‘ब्लूहेल्थ स्क्रिनर’च्या यशस्वी चाचणीची माहिती
  • प्रवाशांना होणार मोठा फायदा
मुंबई , ३ फेब्रुवारी २०२६ : ब्‍लू क्‍लाऊड सॉफ्टेक सोल्‍यूशन्‍स लि. (बीसीएसएसएल) या आघाडीच्‍या एआय-संचालित उद्योग व सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीला गोव्‍यातील मडगाव रेल्‍वे स्‍टेशन येथे कोकण रेल्‍वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) aसाठी केलेल्‍या त्‍यांच्‍या ब्‍लूहेल्‍थ स्क्रिनर व ब्‍लूहेल्‍थ स्‍कॅनर प्रूफ ऑफ कन्‍सेप्‍ट (पीओसी)च्‍या यशस्‍वी पूर्ततेची घोषणा करताना आनंद होत आहे.

१५ ते १६ जानेवारी २०२६ पर्यंत करण्‍यात आलेल्‍या पीओसीमधून प्रत्‍यक्ष रेल्‍वे कामकाजादरम्‍यान ब्‍लूहेल्‍थच्‍या एआय-सक्षम प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य तपासणी प्‍लॅटफॉर्मची परिणामकारकता दिसून आली. या दोन दिवसांमध्‍ये ब्‍लू क्‍लाऊड टीमने आपली अत्‍याधुनिक तपासणी व नैदानिक सोल्‍यूशन्‍स तैनात करून रेल्‍वे कर्मचारी व प्रवाशांच्‍या आरोग्‍याची तपासणी केली, ज्‍यादरम्‍यान त्‍वरित, नॉन-इन्‍वेसिसव्‍ह एआय-समर्थित तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आला.

पीओसीची प्रमुख वैशिष्‍ट्ये – अंमलबजावणी व सहभाग

मडगावमध्‍ये केआरसीएल रेल्‍वे स्‍टेशन येथे १५ ते १६ जानेवारी २०२६ पर्यंत ब्‍लूहेल्‍थच्‍या एआय-सक्षम आरोग्‍य तपासणी प्‍लॅटफॉर्मसाठी प्रूफ ऑफ कन्‍सेप्‍ट (पीओसी) करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये केआरसीएलचे कर्मचारी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सक्रियपणे सहभाग घेतला. या दोन दिवसांदरम्‍यान केआरसीएलच्‍या ३० कर्मचाऱ्यांची, तसेच १४ प्रवाशांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली, ज्‍यासह या उपक्रमामध्‍ये ४४ सहभागींना सहभाग घेतला. या उपक्रमामध्‍ये केआरसीएलच्‍या ५ ते ७ अधिकाऱ्यांनी देखरेखीचे काम केले, तसेच ब्‍लूहेल्‍थच्‍या टीममधील २ सदस्‍यांनी साह्य केले. प्रात्‍यक्षिकांमध्‍ये ब्‍लूहेल्‍थ स्क्रिनर व ब्‍लूहेल्‍थ स्‍कॅनरसह प्रत्‍यक्ष सत्रे, हार्ट रेट, रक्‍तदाब, SpO2, हार्ट रेट व्‍हेरिएबिलिटी, स्‍ट्रेस इंडेक्‍स व ईसीजी अशा महत्त्वपूर्ण घटकांची प्रत्‍यक्ष तपासणी, तसेच एआय-निर्मित आरोग्‍याबाबत माहिती यांचा समावेश होता. तसेच केआरसीएल वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत संयुक्‍तपणे चर्चा करत या वैद्यकीय निष्‍पत्तींची पडताळणी करण्‍यात आली, तसेच उपस्थित आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांकडून तपासणी निकालांचे पुनरावलोकन व पुष्‍टी करण्‍यात आली.

IGI कडून AGLचे संपादन; रंगीत रत्न सर्टिफिकेशनमध्ये जागतिक स्तरावर नवा अध्याय

तंत्रज्ञान पडताळणीच्‍या निष्‍पत्ती: पीओसीने खालील क्षमतांची यशस्‍वीपणे पडताळणी केली

ब्‍लूहेल्‍थ एआय-समर्थित आरोग्‍य तपासणी प्‍लॅटफॉर्मसाठी प्रूफ ऑफ कन्‍सेप्‍ट (पीओसी)ने विविध प्रमुख क्षमतांना निदर्शनास आणले. प्रथम म्‍हणजे, या तंत्रज्ञानाने आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण घटकांची अत्यंत अचूक आणि जलद तपासणी करून दाखवली, ज्यामुळे जलद आणि विश्वसनीय आरोग्य तपासणी करणे शक्य झाले. या तंत्रज्ञानामध्‍ये ऑटोमेटेड रिस्‍क स्‍ट्रॅटिफिकेशन (स्‍वयंचलित जोखीम वर्गीकरण) देखील आहे, जी वैद्यकीय दर्जाच्‍या निर्देशकांचा वापर करून व्‍यक्‍तींचे त्‍यांच्‍या आरोग्‍य जोखीमांनुसार वर्गीकृत करते. गर्दीच्‍या रेल्‍वे स्‍टेशन या यंत्रणेची कार्यक्षमता प्रकर्षाने दिसून आली, ज्‍यामधून उच्‍च रहदारी असलेल्‍या सार्वजनिक ठिकाणी या तंत्रज्ञानाचा अवलंब करता येऊ शकतो हे दिसून आले. तसेच या प्‍लॅटफॉर्मने डेटा गोपनीयता आणि अनामिकता मानकांचे काटेकोरपणे पालन केले, ज्‍यासह सहभागींची माहिती गोपनीय राहिली. शेवटचे म्‍हणजे, सहजपणे अहवाल तयार करण्‍याच्‍या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्‍या आरोग्‍याबाबत निष्‍पत्ती त्‍वरित तयार करता आल्‍या, ज्‍यामुळे आरोग्‍य व रेल्‍वे अधिकाऱ्यांना वेळेवर निर्णय घेता आला.

अनामिक केलेल्‍या स्क्रिनिंग लॉग्‍जमधून हार्ट रेट, रक्‍तदाब, श्‍वसन दर, स्‍ट्रेस इंडेक्‍स, शरीराचे तापमान आणि एआयच्‍या माध्‍यमातून विश्‍लेषण केलेले सिंगल-लीड ईसीजी अशा विविध प्रकारच्या निदानांचे निकष नोंदवण्याची आणि त्यांचे विश्‍लेषण करण्याची ब्‍लूहेल्‍थची क्षमता दिसून आली.

”मडगाव रेल्‍वे स्‍टेशन येथे ब्‍लूहेल्‍थ स्क्रिनर आणि ब्‍लूहेल्‍थ स्‍कॅनर प्रूफ ऑफ कन्‍सेप्‍टच्‍या यशस्‍वी पूर्ततेमधून प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवा व सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनामधील नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती ब्‍लू क्‍लाऊड सॉफ्टेक सोल्‍यूशन्‍स लिमिटेडची अविरत समर्पितता दिसून येते,” असे ब्‍लू क्‍लाऊड सॉफ्टेक सोल्‍यूशन्‍स लिमिटेडचे ग्रुप चेअरमन श्री. तेजश कोडाली म्‍हणाले. ”गतीशील रेल्‍वे कामकाजामध्‍ये आमच्‍या एआय-सक्षम ब्‍लूहेल्‍थ प्‍लॅटफॉर्मला तैनात करत आम्‍ही रेल्‍वे कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी विकासात्‍मक, त्‍वरित व अचूक आरोग्‍य तपासणी सोल्‍यूशन्‍स देण्‍यामधील आमची क्षमता दाखवली आहे. आमच्‍या टीमचा कौशल्‍य व सहयोगात्‍मक दृष्टिकोन, तसेच कोकण रेल्‍वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्‍या सक्रिय सहभागामधून खात्री मिळाली की प्रकल्‍पाने उच्‍च वैद्यकीय व कार्यसंचालन मानकांची पूर्तता केली. पुढे वाटचाल करत आम्‍ही प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेत कर्मचाऱ्यांचे आरोग्‍य उत्तम राखण्‍याचा प्रयत्‍न करू, सार्वजनिक आरोग्‍य उपक्रमांना पाठिंबा देऊ आणि भारतातील परिवहन पायाभूत सुविधेच्‍या आधुनिकीकरणामध्‍ये महत्त्‍वपूर्ण योगदान देऊ.”

HDFC Pension Update: अर्बन कंपनी–HDFC पेन्शन यांचे ऐतिहासिक पाऊल! NPC अंतर्गत नवी पेन्शन योजना होणार सुरू 

Web Title: Ai makes a splash on the konkan railway high tech health screening of passengers at madgaon station proves successful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Business News
  • kokan railway

संबंधित बातम्या

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
1

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?
2

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?

SBI देणार 80 हजार कोटींचं कर्ज! 1.10 कोटी खात्यांमध्ये जमा होणार पैसे, Loan वर सरकारची ‘गॅरंटी’…
3

SBI देणार 80 हजार कोटींचं कर्ज! 1.10 कोटी खात्यांमध्ये जमा होणार पैसे, Loan वर सरकारची ‘गॅरंटी’…

Amazon चा पहिला ‘शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध; बनावटगिरी आणि फसवणुकीविरुद्ध ॲमेझॉनची मोठी मोहीम
4

Amazon चा पहिला ‘शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध; बनावटगिरी आणि फसवणुकीविरुद्ध ॲमेझॉनची मोठी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.