Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: जमिनी दिल्या, घरे सोडली; तरीही प्रश्न प्रलंबित! कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

Ratnagiri: मागण्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आआरएम, सीपीओ आणि ऑपरेशन विभागातील वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 04:26 PM
प्रकल्पग्रस्त आता कोकण रेल्वे रोखणार

प्रकल्पग्रस्त आता कोकण रेल्वे रोखणार

Follow Us
Follow Us:
  • प्रकल्पग्रस्त आता कोकण रेल्वे रोखणार
  • मागण्यांसाठी कोकणभूमी कृती समितीचा २६ रोजी रेल रोको 
  • भरतीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी
Ratnagiri: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी, घरे आणि मालमत्तांचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती (Ratnagiri) समितीने आता निर्णायक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. समितीच्या संयुक्त बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी उपोषण आणि रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनापूर्वी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) यांच्यासह राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच कोकणातील संबंधित खासदार व आमदारांना अंतिम पूर्वसूचना निवेदन पाठविण्यात येणार आहे.

मागण्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आआरएम, सीपीओ आणि ऑपरेशन विभागातील वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली होती. मागण्यांमागील कारणे, प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय तसेच संबंधित पुरावे आणि कागदपत्रेही सादर करण्यात आली. मात्र, कोणत्याही मागणीवर ठोस सकारात्मक निर्णय झालेला नाही.

Ratnagiri: एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे धरणांतून पाणीगळती! रत्नागिरीकरांनी पाणी प्यायचं कसं?

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न थेट सीएमडी यांच्यापर्यंत पोहोचविण्याऐवजी वरिष्ठ पातळीवरच मर्यादित ठेवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. केवळ चर्चा आणि आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत सीएमडी यांनी स्वतः हस्तक्षेप करून समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भरतीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी

कोकण रेल्वेच्या गट ‘ड’ स्तर-१ भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी लागू केलेल्या जाचक अटीविरोधात समितीने यापूर्वीच प्रशासनाला निवेदन दिले आहे. भरती प्रक्रियेतील नकारात्मक गुणपद्धती रह करणे, ३५ किलो वजन वाहून नेण्याची शारीरिक चाचणी रद्द करणे, एक किलोमीटर धावण्याच्या चाचणीत वयानुसार सवलत देणे, तसेच कंत्राटी कामगार व्यवस्थेत प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

प्रकल्पग्रस्तांच्या दहा महत्त्वपूर्ण प्रकरणांची स्वतंत्रयाणे आणि सखोल पुनर्तपासणी करण्याची मागणीही समितीने केली आहे. यामध्ये जमिनीची संयुक्त व स्वतंत्र मालकी, एक कुटुंब एक नोकरीसाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र, मुलगी, नातू व नात यांच्या पात्रतेचा प्रश्न, वारसांच्या संमतीपत्रासाठी होणारा विलंब आणि इतर पात्रताविषयक बाबीचा समावेश आहे. या प्रकरणांची पुनर्तपासणी करून न्याय्य निर्णय घेण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही किंवा लेखी उत्तर मिळाले नसल्याचा आरोप समितीने केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती 26 तारखेला काय करणार?

    Ans: कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी उपोषण आणि रेल रोको आंदोलन करणार आहेत.

  • Que: कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा आरोप काय?

    Ans: वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही किंवा लेखी उत्तर मिळाले नसल्याचा आरोप समितीने केला आहे.

Web Title: Kokanbhumi project affected people protest against kokan railway ratnagiri tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Indian Railway
  • kokan railway
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!
1

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!

Indian Railways: मोठा अपघात टळला! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक विस्कळीत
2

Indian Railways: मोठा अपघात टळला! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक विस्कळीत

Diwali मध्ये गावी जाण्याचा प्लॅन केलाय? नियमित गाड्यांसह स्पेशल ट्रेनचेही आरक्षण…; प्रवाशांचे टेन्शन वाढले
3

Diwali मध्ये गावी जाण्याचा प्लॅन केलाय? नियमित गाड्यांसह स्पेशल ट्रेनचेही आरक्षण…; प्रवाशांचे टेन्शन वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.