air India signs deal with ge aerospace for record aircraft order know what things will get in the contract nrvb
मुंबई : एअर इंडिया (Air India) या टाटा सन्सचा (Tata Sons) भाग असलेल्या कंपनीने ४० जीईएनएक्स-१बी आणि २० जीई९एक्स इंजिन्स, तसेच बहुवार्षिक ट्रूचॉईस इंजिन सर्विसेस करारासाठी फर्म ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. २० बोईंग ७८७ आणि १० बोइंग ७७७एक्स विमानासाठी विमानसेवेच्या फर्म ऑर्डरसह समन्वयाने या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
‘‘टाटा ग्रुप व एअर इंडियामध्ये आम्हा सर्वांना जीई एरोस्पेससोबत हा सहयोग करण्याचा आनंद होत आहे, जेथे आम्ही एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा बनवण्यासोबत सर्वात तंत्रज्ञान-प्रगत विमानसेवा बनवू,’’ असे टाटा सन्स व एअर इंडियाचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हणाले.
‘‘आम्हाला टाटा ग्रुप व एअर इंडियासोबतची आमची दीघ्रकालीन भागीदारी सुरू ठेवण्याचा अभिमान वाटतो,’’ असे जीईचे ज्युनिअर अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जीई एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्स कल्प म्हणाले. ‘‘आम्ही एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये हे इंजिन्स सादर करण्याप्रती सहयोगाने काम करण्यास उत्सुक आहोत आणि ते अपवादात्मक कामगिरी देण्याची खात्री घेण्याप्रती कटिबद्ध आहोत.’’
जीई एरोस्पसेने १९८२ पासून एअर इंडियाला पाठिंबा दिला आहे, त्यावेळी विमानसेवेने त्यांच्या पहिल्या सीएफ६-पॉवर्ड एअरबस ए३०० ची डिलिव्हरी घेतली होती. विमानसेवा सध्या १५० हून अधिक विमानांच्या ताफ्याचे कार्यसंचालन पाहते, ज्यामध्ये जीई९०-पॉवर्ड बोईंग ७७७एस आणि जीईएनएक्स-पॉवर्ड बोईंग ७८७एस यांचा समावेश आहे.
एअर इंडियाने ८०० पेक्षा जास्त लीप इंजिन्ससाठी सीएफएम ऑर्डरची देखील घोषणा केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी लीप ऑर्डर आहे, ज्यामुळे २१० एअरबस ए३२०/ए३२१निओ विमाने आणि १९० बोईंग ७३७ मॅक्स-फॅमिली विमानांची संपूर्ण खरेदी करता येईल. या घोषणेमध्ये बहु-वर्षीय सीएफएम सेवा कराराचा समावेश आहे. सीएफएम हा जीई आणि सॅफ्रॅन एअरक्राफ्ट इंजिन यांच्यामधील ५०/५० चा संयुक्त व्यवसाय आहे.
‘‘जीई एरोस्पेस इंजिन्ससाठी ही ऑर्डर आमच्या Vihaan.AI परिवर्तन योजनेला समर्थन देते, ज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आमचा ताफा आणि जागतिक नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा आहे,’’ असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले. ‘‘आम्हाला विश्वास आहे की, हे इंजिन्स आम्हाला आवश्यक असलेली विश्वासार्हता व कार्यक्षमता प्रदान करतील आणि आम्हाला जीईसोबतच्या आमच्या दीर्घकालीन संबंधाला कायम ठेवण्याचा आनंद होत आहे.’’
‘‘गेल्या दशकामध्ये आम्ही लक्षणीयरित्या अधिक इंधन कार्यक्षम, आवाजरहित कार्यरत व कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करणाऱ्या व्यावसायिक इंजिन्सचा नवीन पोर्टफोलिओ सादर केला आहे,’’ असे जीई एरोस्पेससाठी कमर्शियल इंजिन्स ॲण्ड सर्विसेसचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रसेल स्टोक्स म्हणाले. ‘‘या विक्रमी ऑर्डरमधून आमचे प्रबळ उत्पादन नूतनीकरण आणि ग्राहकांचा आमच्या इंजिन्सवरील सातत्यपूर्ण आत्मविश्वास दिसून येतो.’’