Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akasa Air : अकासा एअरने राजस्थानमध्ये केला प्रवेश! या नव्या मार्गिकेवरून होणार प्रवास सुरु

भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या अकासा एअरने राजस्थानमध्ये प्रवेश करत उदयपूरला आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबर २०२६पासून मुंबई आणि बेंगळुरूहून उदयपूरसाठी दररोज थेट उड्डाणे सुरू होणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2026 | 04:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या अकासा एअरने राजस्थानमध्ये प्रवेश करत उदयपूरला आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबर २०२६पासून मुंबई आणि बेंगळुरूहून उदयपूरसाठी दररोज थेट उड्डाणे सुरू होणार असून, यामुळे राजस्थानातील प्रमुख पर्यटनस्थळाची हवाई संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती

उदयपूरसाठीच्या उड्डाणांचे बुकिंग अकासा एअरच्या संकेतस्थळासह मोबाईल अॅप, प्रमुख ट्रॅव्हल एजंट्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. प्रीमियम पर्यटन, डेस्टिनेशन वेडिंग आणि अनुभवाधारित प्रवासासाठी देशभरातून वाढणारी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. राजस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या उदयपूरला थेट जोडल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी आनंद श्रीनिवासन यांनी सांगितले की, उदयपूर हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असून, सुट्टी आणि पर्यटनासाठी या शहराला वर्षभर मोठी मागणी असते. मुंबई आणि बेंगळुरूहून थेट सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांना अधिक जलद आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार मजबूत आणि मागणीआधारित नेटवर्क उभारण्यावर कंपनीचा सातत्याने भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

१५ ऑक्टोबरपासून बेंगळुरू–उदयपूर आणि मुंबई–उदयपूर या दोन्ही मार्गांवर दररोज नॉन-स्टॉप उड्डाणे उपलब्ध असतील. सकाळ आणि दुपारच्या वेळेत नियोजित या सेवांमुळे पर्यटनासह व्यावसायिक प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. राजस्थानकडे जाणाऱ्या हवाई प्रवासासाठी हा पर्याय अधिक सोयीचा आणि वेळेची बचत करणारा ठरणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

अल्पावधीतच अकासा एअरने आधुनिक विमानांचा ताफा, ग्राहककेंद्री सेवा आणि नाविन्यपूर्ण सुविधांच्या जोरावर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विमानांमध्ये अधिक लेगस्पेस, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, ‘कॅफे अकासा’मधील विविध खाद्यपदार्थ, तसेच ‘अकासा गेटअर्ली’, ‘सीट अँड मील डील’, ‘एक्स्ट्रा सीट’ आणि ‘अकासा हॉलिडेज’सारख्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय ‘स्कायस्कोर’, ‘स्कायलाईट्स’ आणि ‘क्वायटफ्लाईट्स’ यांसारखे ग्राहकाभिमुख उपक्रमही कंपनीने सुरू केले आहेत.

Instamart : इन्स्टामार्टच्या मुख्य व्यवसाय अधिकारीपदी गौतम स्वरूप; उत्पादन श्रेणी विस्तारावर भर

उदयपूरचा समावेश हा अकासा एअरच्या विस्तार धोरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. देशातील उच्च क्षमतेच्या पर्यटन बाजारपेठांना मजबूत हवाई संपर्क उपलब्ध करून देत मागणीआधारित नेटवर्क उभारण्याच्या कंपनीच्या धोरणाला या नव्या सेवेमुळे आणखी बळ मिळणार आहे. आगामी काळातही देशांतर्गत नेटवर्कचा विस्तार करून अधिकाधिक शहरांना जोडण्याचा कंपनीचा मानस असल्याचे संकेत या घोषणेतून मिळाले आहेत.

Web Title: Akasa air enters rajasthan flight mumbai to udaipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • air india

संबंधित बातम्या

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?
1

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?

Air India Pilot : २४ तासांत वैमानिकाचा धुमाकूळ! कॉकपिटमध्ये क्रूसोबत वाद, विमानात गोंधळ अन् डोप टेस्टमध्ये गांजा पॉझिटिव्ह
2

Air India Pilot : २४ तासांत वैमानिकाचा धुमाकूळ! कॉकपिटमध्ये क्रूसोबत वाद, विमानात गोंधळ अन् डोप टेस्टमध्ये गांजा पॉझिटिव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.