Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षाबंधनाचा गिफ्ट प्लॅन तयार? Amazon Pay घेऊन आलंय राखीसाठी भन्नाट सरप्राइज

Amazon Pay: रक्षाबंधन जवळ आल्याने भाऊ-बहिणींसाठी खास भेटवस्तू निवडण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा Amazon Pay Gift Cardsने रक्षाबंधनासाठी काही खास पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाइन पाठवता येणाऱ्या गिफ्ट कार्ड्ससोबतच प्रत्यक्ष भेट देता येतील असे आकर्षक गिफ्ट बॉक्सही उपलब्ध आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 01:15 PM
रक्षाबंधनाचा गिफ्ट प्लॅन तयार? Amazon Pay (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

रक्षाबंधनाचा गिफ्ट प्लॅन तयार? Amazon Pay (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Amazon Pay Gift Cardsचे रक्षाबंधनासाठी खास पर्याय.
  • ऑनलाइन गिफ्ट कार्ड्ससोबत आकर्षक गिफ्ट बॉक्सची सुविधा.
  • भाऊ-बहिणींसाठी शेवटच्या क्षणीही निवडता येतील खास गिफ्ट पर्याय.
रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाऊ आणि बहिणींसाठी भेटवस्तू निवडण्याची लगबग सुरु होते. काय गिफ्ट देयचं असा प्रश्न नेहमीच नेहमीच्या कपड्यांपासून परफ्यूमपर्यंत अनेक पर्याय समोर असतात, पण समोरच्याला नेमकं काय आवडेल, हा प्रश्न कायम असतो. याच गोष्टीचा विचार करत Amazon Pay Gift Cards ने यंदाच्या रक्षाबंधनासाठी काही खास पर्याय आणले आहेत.

या ऑफरमध्ये फक्त ऑनलाइन पाठवता येणारी भेटवस्तू नाही, तर हातात देता येईल अशा आकर्षक गिफ्ट बॉक्सचाही समावेश आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी भेटवस्तू घेण्याची वेळ आली तरी पर्याय उपलब्ध असणार आहेत.

राखीसाठी खास गिफ्ट बॉक्स

यंदा Amazon Pay कडून फिजिकल गिफ्ट कार्ड्स खास राखी थीम असलेल्या प्रीमियम बॉक्समध्ये मिळणार आहेत. म्हणजे कार्ड फक्त एका साध्या लिफाफ्यात देण्याऐवजी ते व्यवस्थित गिफ्ट पॅकच्या स्वरूपात भावाला किंवा बहिणीला देता येईल.

विशेष म्हणजे काही ठिकाणी या बॉक्ससाठी सेम-डे डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आज भेटवस्तूची आठवण झाली आणि आजच ती पाठवायची असेल, तरी पर्याय आहे. काही निवडक शहरांमध्ये आणि पिनकोडवर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीची सुविधाही मिळणार आहे. फिजिकल गिफ्ट कार्ड घेताना ग्राहकांना ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. त्यामुळे भेटवस्तूसोबत थोडी बचतही करता येणार आहे.

भेटवस्तू निवडण्याची चिंता कमी

रक्षाबंधनासाठी योग्य गिफ्ट शोधताना अनेकांना वेळ जातो. Amazon Pay ने केलेल्या अभ्यासातही भेटवस्तू निवडताना वेळेची अडचण आणि योग्य वस्तू शोधण्याचा त्रास अनेकांना जाणवत असल्याचं समोर आलं आहे. अशा वेळी गिफ्ट कार्ड हा सोपा पर्याय ठरू शकतो. कारण समोरच्याला स्वतःच्या आवडीची वस्तू निवडता येते. कपडे आवडतात की इलेक्ट्रॉनिक्स, घरातील वस्तू हव्यात की गेमिंगशी संबंधित काही घ्यायचं आहे, याचा निर्णय गिफ्ट मिळणाऱ्या व्यक्तीलाच घेता येतो.

WhatsApp वरून क्षणार्धात पाठवा

ज्यांना प्रत्यक्ष गिफ्ट पाठवणं शक्य नाही, त्यांच्यासाठी ई-गिफ्ट कार्डचा पर्याय आहे. हे कार्ड WhatsApp किंवा ईमेलवरून थेट पाठवता येईल. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात किंवा परदेशात असलेल्या भावंडांनाही रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू पोहोचवता येऊ शकते. ई-गिफ्ट कार्डच्या खरेदीवर १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची ऑफरही आहे. त्यामुळे काही मिनिटांत भेटवस्तूची तयारी पूर्ण करता येईल.

आता फोटोही कार्डवर लावता येणार

यंदाच्या सुविधांमध्ये पर्सनल टच देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भावासोबतचा किंवा बहिणीसोबतचा एखादा खास फोटो कार्डवर वापरून ते स्वतःच्या पद्धतीने सजवता येणार आहे. याशिवाय राखीशी संबंधित रंगीबेरंगी अॅनिमेटेड डिझाइन्स उपलब्ध असतील. ज्यांना थोडं वेगळं आणि आधुनिक काहीतरी हवं आहे, त्यांच्यासाठी जनरेटिव्ह AI च्या मदतीने तयार होणाऱ्या डिझाइन्सचाही पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे गिफ्ट कार्डवर फक्त नाव लिहिण्यापुरतं पर्सनलायझेशन मर्यादित राहणार नाही.

HDFC Bank: एचडीएफसी बँकेचा मोठा कारनामा! जागतिक बाजारात डंका, $1.75 अरब गोळा करत मोडला 18 वर्षांचा रेकॉर्ड

फक्त १० रुपयांपासून सुरुवात

या गिफ्ट कार्ड्सची सुरुवात १० रुपयांपासून होते. त्यामुळे प्रत्येकाच्या बजेटनुसार पर्याय निवडता येऊ शकतो. कार्डचा वापर Amazon वरील १५ कोटींपेक्षा अधिक वस्तूंवर करता येतो. याशिवाय २० हजारांहून अधिक पार्टनर अॅप्सवरही त्याचा उपयोग करता येणार आहे. फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, गेमिंग अशा अनेक प्रकारच्या खरेदीसाठी हे कार्ड वापरण्याची मुभा असल्याने भेट मिळालेल्या व्यक्तीला आपल्या गरजेनुसार वस्तू निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं.

Amazon Pay ICICI कार्डधारकांसाठीही फायदा

Amazon Pay ICICI Bank Credit Card वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आणखी एक खास फायदा आहे. या रक्षाबंधनाच्या काळात गिफ्ट कार्डच्या खरेदीवर २ टक्के अमर्याद कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात, या ऑफर्ससाठी लागू असलेल्या नियम व अटी तपासणे आवश्यक आहे.

US Iran War: पाकिस्तान-ईराणच्या संकटाने Air India आणि Indigo ला जोराचा झटका! विदेशी एअरलाईन्सची मात्र चंगळ

एकंदरीत पाहता, यंदाच्या रक्षाबंधनासाठी Amazon Pay ने पारंपरिक भेटवस्तू आणि डिजिटल सुविधांचा चांगला मेळ घातला आहे. हातात देण्यासाठी सुंदर बॉक्स हवा असेल, क्षणात WhatsApp वर गिफ्ट पाठवायचं असेल किंवा जुन्या आठवणीचा फोटो कार्डमध्ये जपायचा असेल, प्रत्येकासाठी काही ना काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या गडबडीत “काय गिफ्ट द्यायचं?” हा प्रश्न थोडा सोपा होणार आहे.

Web Title: Amazon pay raksha bandhan gift cards gift boxes and ai designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • amazon
  • Raksha Bandhan

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
1

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
2

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
3

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार
4

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.