शेअर बाजारात आपटी, अन् एकाच दिवसात अंबानी-अदानी यांचे हजारो कोटींचे नुकसान!
मागील गुरुवारपासून अमेरिकी शेअर बाजारासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. परिणामी, जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. भारतीय शेअर बाजार देखील शुक्रवारपासून घसरणीला लागला आहे. सोमवार (ता.५) तर भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला आहे. सोमवारी शेअर बाजार तब्बल 1500 अंकांनी घसरला. ज्याचा थेट परिणाम देशातील आघाडीच्या उद्योगपतींच्या संपत्तीवर झाला आहे. आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 86 हजार कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.
किती घटलीये मुकेश अंबानी यांची संपत्ती?
ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार, सोमवारी शेअर बाजारात घसरण झाल्याने, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ एकाच दिवसात 3.95 अब्ज डॉलर (सुमारे 33 हजार कोटी रुपये) घट झाली आहे. त्यामुळे एकाच दिवसात या कपातीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती 109 अब्ज डॉलरवर आली आहे. तर दुसरीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजलाही सोमवारी (ता.६) शेअर बाजारातील घसरणीमुळे मोठा फटका बसला. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग ३.४० टक्क्यांहून अधिक घसरले होते. या घसरणीमुळे कंपनीचे सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.
हेही वाचा : गौतम अदानींनंतर कोण सांभाळणार अदानी समूहाचा गाडा; ठरलेत ‘हे’ चार वारसदार!
किती घटलीये गौतम अदानी यांची संपत्ती?
शेअर बाजारातील घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झाला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एका दिवसात अदानी यांच्या संपत्तीत 6.31 बिलियन डॉलर (सुमारे 53 हजार कोटी) ची घट झाली आहे. या घसरणीमुळे अदानी यांची संपत्ती 104 अब्ज डॉलरवर गेली आहे. सोमवारी बाजारातील घसरणीचा परिणाम अदानींच्या कंपन्यांवरही झाला. अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत घसरले होते. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर इत्यादींचा समावेश आहे.
हेही वाचा : ‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!
मंगळवारी शेअर बाजारात सुधारणा
मंगळवारी (ता.६) शेअर बाजार शेअर बाजार सुरु होताच, हिरव्या निशाणीवर सुरु झाला आहे. बाजार सुरु होताच तासाभरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1.50 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज 2942 रुपयांवर व्यवहार करत होता. त्याचबरोबर अदानी समूहाच्या जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी चांगली कामगिरी करताना दिसले. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये आज सुमारे 3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.